शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या 78 गावातही अभिजित पाटलांना आघाडी:पंढरपूर तालुक्यातील 42 गावात भूमिपूत्र म्हणून मिळाली लीड

2 hours ago 1
माळशिरस तालुक्यातील १४ गावामध्ये मोहिते पाटील यांचा फॅक्टर चालल्यामुळे अभिजित पाटील यांना या भागातून मताधिक्य मिळाले आहे. तालुका गावे पाटील शिंदे मताधिक्य माढा ७८ ६३५०५ ६२७४९ ७५६ पंढरपूर ४२ ५४८२३ २८८९७ २५९२६ माळशिरस १४ १७०९० १३४०१ ३६८९ हिम्मत जाधव|माढा माढा विधानसभा मतदारसंघातील आमदार बबनराव शिंदे यांचे वर्चस्व असलेल्या माढा तालुक्यातील ७८ गावातही अभिजित पाटील यांनी आघाडी घेतल्याने आमदार सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांना पराभवास सामोरे जावे लागले. शिवाय पंढरपूर तालुक्यातील ४२ गावात भूमिपूत्राचा मुद्दा तसेच माळशिरस तालुक्यातील १४ गावांत मोहिते -पाटील फॅक्टर चालल्यामुळे शिंदे यांचे वर्चस्व मोडीत काढत तुतारीने विजय साकार केला. माढा मतदारसंघाच्या तिरंगी लढत असलीतरी खरी लढत आ.बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील यांच्यात झाली. माढा मतदारसंघामध्ये माढा तालुक्यातील ७८ , पंढरपूर तालुक्यातील ४२ तर माळशिरस तालुक्यातील १४ गावांचा समावेश आहे. माढा तालुक्यातील काही ग्रामपंचायतींचा अपवाद वगळता सर्व ग्रामपंचायतीवर शिंदे गटाची सत्ता आहे. त्याबरोबरच जिल्हा परिषद गट, पंचायत समिती सारख्या सर्व सत्ता स्थानांवर आ.शिंदे यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे.नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये कृषीनिष्ट परिवाराचे नितीन कापसे,माजी जि प.सदस्य आनंदराव कानडे, जिल्हा दुध संघाचे माजी संचालक राजेंद्र चवरे ,माढ्याचे माजी नगरसेवक शहाजी साठे, माढा विधानसभेसाठी इच्छुक असलेले संजय कोकाटे,मोडनिंबचे माजी जि.प.सदस्य भारत शिंदे,ऊपळाई बुद्रुकचे दिपक देशमुख ,ऊपळाई खुर्दच्या ज्योतीताई कुलकर्णी, टेंभूर्णीचे रावसाहेब देशमुख,सूरज देशमुख,या स्थानिक नेत्यांची त्यांना मोलाची मदत झाली पंढरपूर तालुक्यातील परिचारक गट , विठ्ठल परिवार यांचेबरोबरच आ.शिंदे यांचे राजकीय विरोधक मानले जाणारे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा शिवाजीराव सावंत व महाविकास आघाडीतून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले माजी समाज कल्याण समितीचे सभापती शिवाजीराजे कांबळे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर रणजितसिंह शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे माढा तालुक्यात असलेल्या ७८ गावांमधून रणजितसिंह शिंदे यांना मताधिक्य मिळण्याच्या शक्यता वाढल्या होत्या. परंतू आ.बबनराव शिंदे यांनी शरद पवार व अजित पवार यांची सोडलेली साथ,अपक्ष निवडणूक लढण्याचा घेतलेला निर्णय तसेच लोकसभेपासून शरद पवाराबद्दलं कायम राहिलेलीे सहानुतीची लाटेमुळे होमपीचवर शिंदे पिछाडीवर राहिले. माढा, मोडनिंबमध्ये मताधिक्य तालुक्यातील प्रमुख गावे असलेल्या माढा ,मोडनिंब, टेंभुर्णी, बावी ,ऊपळाई बुद्रुक,बेंबळे यांसारख्या बलाढ्य गावांमधून अभिजित पाटील हे रणजितसिंह शिंदे यांच्या बरोबरीने अथवा मताधिक्य घेण्यात यशस्वी ठरले. पंढरपूर तालुक्यातील ४२ गावांमधील देगांवचे रहिवासी असलेल्या अभिजित पाटील यांना भूमिपुत्र असल्याचा फायदा झाला.रणजितसिंह शिंदे यांना पाठींबा दिलेले करकंब भोसे येथील गणेश पाटील यांचा अभिजित पाटलांना विरोध असूनही करकंब भागातून पाटील यांना जवळपास ७० टक्के मते मिळाली आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article