शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या जाहिरातीतून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न कऱण्यात आलाय. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावत शिंदे गटाने वृत्तपत्राला जाहीरात दिली आहे. ‘मी, माझी शिवसेना कधीच काँग्रेस होऊ देणार नाही.’ असे बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य जाहिरातीतून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून उद्या १८ नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी होणारा प्रचार राजकीय नेत्यांचा बंद होणार आहे. प्रचाराच्या तोफा उद्या थंडावण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंची शिवसेना विरूद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. तर आज शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या स्मृतिदिनी शिवसेना विरुद्ध शिवसेना भिडल्याचे दिसतंय. कुठे शिंदे गट आणि उद्धव गटामध्ये पोस्टर वॉर रंगलंय तर दुसरीकडे शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या जाहिरातीतून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न कऱण्यात आलाय. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावत शिंदे गटाने वृत्तपत्राला जाहीरात दिली आहे. ‘मी, माझी शिवसेना कधीच काँग्रेस होऊ देणार नाही.’ असे बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य जाहिरातीतून प्रसिद्ध करण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे हे वक्तव्य शिंदे गटाने प्रसिद्ध केले आहे. विविध वृत्तपत्रात याची जाहिरात आणि होर्डिंग लावण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या मोठ्या फोटोसह यामध्ये त्यांचं हे वाक्य देण्यात आले आहे. तर उद्धव ठाकरे यांनी पलटवार करत भाजपची कमळाबाई होऊन देईन, असं बाळासाहेब म्हणाले होते का? असा सवालही त्यांनी केलाय.
Published on: Nov 17, 2024 05:19 PM