शिर्डी एमआयडीसीत उद्योजकांनी स्थानिक युवकांनाच प्राधान्य द्यावे:शिर्डी येथील कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आवाहन

5 days ago 3
मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे निर्माण होणारा औैद्योगिक विकास जिल्‍ह्याची नवी ओळख करून देणारा ठरेल. औद्योगिक वसाहतीमध्‍ये उभारण्‍यात येणाऱ्या डिफेन्स कलस्टरमुळे शिर्डी व परिसरातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. येणाऱ्या उद्योजकांनीही स्थानिक युवकांना रोजगारासाठी प्राधान्य देण्‍याचे आवाहन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. सावळीविहीर येथे शिर्डी औद्योगिक विकास महामंडळ व‌ डिफेन्स कलस्टरचे भूमिपूजन उद्योगमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या कार्यक्रमास आमदार आशुतोष काळे, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के, शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, निबे लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे उपस्थित होते. उद्योगमंत्री म्हणाले सामंत म्हणाले, येत्या काळात राज्यात पाच ठिकाणी डिफेन्स कलस्टर सुरू करण्यात येणार आहेत‌. यातील एक डिफेन्स कलस्टर शिर्डी एमआयडीसी सुरू करण्यात येत आहे‌. डिफेन्स कलस्टरच्या माध्यमातून १२०० कोटींची गुंतवणूक होणार आहे. मंत्री विखे पाटील म्हणाले, एमआयडीसी शिर्डी व परिसरातील युवकांसाठी नवा आशेचा किरण आहे‌. या माध्यमातून हजारो तरुणांना कायमस्वरूपी रोजगार मिळणार आहे. कोपरगावात एमआयडीसी उभारण्यासाठी शेती महामंडळाची ३०० एकर जागा विनाशूल्क उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही देतानाच जिल्‍ह्यामध्‍ये अधिकची गुंतवणूक यावी, हा आपला प्रयत्‍न आहे. जिल्‍ह्यामध्‍ये औद्योगिक वातावरण निर्माण व्‍हावे, यासाठी सर्वांच्‍या सहकार्याची अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली. आमदार आशुतोष काळे यांचेही यावेळी भाषण झाले. लार्सन अॅन्‍ड टर्बो कंपनीच्‍या व्‍यवस्‍थापन परि‍षदेचे सदस्‍य जयंत पाटील यांनी डिफेंन्‍स क्‍लस्टर पध्‍दतीचा सहावा प्रकल्प या ठिकाणी विकसित होत असल्‍याचे सांगितले. सावळीविहीर (ता.राहाता) येथील शेती महामंडळाच्या ५०२ एकर जागेवर शिर्डी एमआयडीसी साकार होणार आहे. राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रूक व सावळीविहीर खुर्द तसेच कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे या गावांच्या क्षेत्रात एमआयडीसीची जागा महसूल मंत्री विखे पाटील यांनी उप‍लब्‍ध करून दिली. शासनाच्या जमिनीवर भूसंपादनाविना विकसित करण्यात येणारी ही राज्यातील पहिलीच एमआयडीसी ठरणार आहे. रस्ते आणि वीज विकासासाठी १०० कोटी रुपयांची मान्यता यापूर्वीच देण्यात आली. दोन हजार तरुणांना मिळणार रोजगार शिर्डी एमआयडीसीत आज डिफेन्स कॅलस्टरचे भूमिपूजन करण्यात आले. एमआयडीसीच्या २०० एकर जागेत हे क्लस्टर साकार होणार आहे. पुणेस्थित निबे लिमिटेड ही संरक्षण सामग्रीची निर्मिती करणारी कंपनी या कॅलस्टरमध्ये पहिला कारखाना उभारणार आहे. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे हे राहाता तालुक्यातील भूमिपुत्र आहेत. या माध्यमातून एक हजार कोटींची गुंतवणूक होणार असून या क्लस्टरमध्ये शिर्डी व परिसरातील २ हजार तरुणांना थेट नवीन रोजगार उपलब्ध होणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article