शिवरायांचे मावळे एकमेकांच्या विरोधात उभे:हे चित्र महाराष्ट्रासाठी भुषणावह नाही, देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आक्षणावर भाष्य

2 hours ago 1
मराठा समाजाने सातत्याने विविध समाजाचे नेतृत्व केले आहे. 18 पगड जातीतले शिवरायांचे मावळे एकमेकांच्या विरोधात उभे हे चित्र राज्यात उभे राहणे योग्य नाही, तसे होऊ नये यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ते न्यायलयात टिकवले पाहिजे. आता झालेल्या पोलिस भरतीमध्ये मराठा बांधवांना 10 टक्के आरक्षणाचा फायदा झाला असेही त्यांनी नवी मुंबईत बोलताना म्हटले आहे. नेमके फडणवीसांचे वक्तव्य काय? देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा समाजाला दिलेले आरक्षण मी मुख्यमंत्री असेपर्यंत सुप्रीम कोर्टात टिकले, त्यानंतरच्या सरकारने आरक्षण टिकवले नाही. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 10 टक्क्यांचे आरक्षण आपण दिले, याच काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी EWS चे आरक्षण दिले या दोन्ही आरक्षणाचा फायदा मराठा बांधवांना मिळत होता. वेगळ्या आरक्षणाची मागणी असल्याने आपण 10 टक्के आरक्षण दिले. आज वेगवेगळ्या मागण्या होत आहे, यातील कुठली चुक आहे असे मी म्हणणार नाही. मात्र, आपण जी मागणी करतोय ती कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे. नाहीतर एखादा निर्णय आपण घ्यायचा आणि तो कायद्यांच्या चौकटीत बसला नाही म्हणून न्यायालयाने रद्द करायचा ही फरफट मराठा समाजाची होता कामा नये, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे. 1 लाख मराठा तरुणांना उद्योजक केले देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारम्हणून आमचे प्रयत्न आहे की मराठा समाजाचे हक्क मिळावे, आणि समाजात कुठेही दुफळी निर्माण होऊ नये या दृष्टीने आपले प्रयत्न आहेत. मराठा समाजाच्या हितासाठी आपण सारथीसारख्या संस्थेची निर्मिती केली. यातून अनेक अधिकारी घडले. त्यापेक्षा आण्णासाहेब पाटील महामंडळांच्या माध्यमातून अनेकांना व्यवसाय सुरू करता आला. मराठा समाजातील अनेक उद्योजक या मार्फत घडले आहेत. जवळपास 1 लाख मराठा तरुणांना नरेंद्र पाटील यांनी उद्योजक केले. हे सगळे श्रेय नरेंद्र पाटील यांचे आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article