चित्रपटाची शुटींग करताना अनेक कलाकारांना कसला कसला अनुभव हा येतच असतो. हॉरर चित्रपटांचे शुटींग सुरु असताना कित्येक कलाकारांना विचित्र अनुभव आल्याचं त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. तर कोणी एखाद्या अनोखी व्यक्तीचा, फॅनचे अनुभव सांगितलेले आपण ऐकले आणि पाहिले असतील. पण एका अभिनेत्याला चक्क शुटींग दरम्यान भगवान शीव दिसल्याचं समोर आलं आहे.
रवी किशनला चक्क भगवान शिवाचे दर्शन
या अभिनेत्याने एका मुलाखती दरम्यान या प्रसंगाचा उल्लेख केला आहे. हा अभिनेता म्हणजे सुप्रसिद्ध भोजपुरी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम कलेला अभिनेता म्हणजे रवी किशन. रवी किशन याने त्याच्या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान घडलेला एक प्रसंग सांगितला आहे. त्यांना शुटींग दरम्यानं चक्क भगवान शकंरांचं दर्शन झाल्याचं म्हटलं.
700 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले अभिनेते रवि किशन यांची आध्यात्मिक बाजूही समोर आली आहे. अलीकडेच, त्यांनी भगवान शिवावरील त्यांची भक्ती आणि श्रद्धा याबद्दल सांगितले आणि त्याला भगवान शिवांचा आलेला अनुभवही सांगितला.
मनालीमध्ये शुटींग दरम्यान पर्वतावरून चालताना दिसले भगवान शीव
नेमका काय प्रसंग घडला होता ते जाणून घेऊ, मनालीमध्ये चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गवान शिवाचे दर्शन झाल्याचं रवी किशन यांनी म्हटलं आहे. रवी किशनने एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘मला आठवतंय जेव्हा मी मनोज बाजपेयी, मानव कौल, पियुष मिश्रासोबत 1971चं शूटिंग करत होतो. आम्ही सगळे मनालीमध्ये होतो. आम्ही तिथे शूटिंग करत होतो. आम्ही संपूर्ण रात्र शूट केलं आणि नंतर आम्हाला सकाळचे शॉट्स देखील करायचे होते म्हणून आम्ही सकाळपर्यंत शूटिंग सुरू ठेवलं. आम्ही सूर्य उगवण्याची वाट पाहत होतो आणि आमच्या सभोवतालचे सर्व पर्वत बर्फाने झाकले होते.”
रविकिशनला भगवान शिवाचे दर्शन कसे झाले?
रवी किशन चित्रपटाच्या शुटींगदरम्यान एका सीनवेळी त्याची नजर डोंगरावर पडली आणि त्याला चक्क शिवा चालताना दिसले. रवी म्हणाला, ‘मी जेव्हा माझा शॉट देत होतो, तेव्हा मी पर्वतांकडे पाहिले आणि मला शिवा पर्वतावर चालताना दिसले. तो व्यक्ती खूप मोठा होता. माझ्या शेजारी मनोज बाजपेयी आणि दीपक डोबरियाल हेही होते. मी त्या दोघांना बघायला सांगितलं. पण मला माहित नाही की मनोजने ते पाहिले की नाही, किंवा कदाचित त्याला वाटले की मी काहीतरी वेगळे पाहत आहे’
‘युद्ध’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घडला किस्सा
हा किस्सा 1971 मध्ये मनालीमध्ये ‘युद्ध’ चित्रपटाचे शूटिंग करताना घडल्याचं रवीने सांगितलं. पण रवी यांना पुर्ण विश्वास आहे की त्या पर्वतावरून चालणारा तो भव्य व्यक्ती शिवाच होते. रवी किशन निस्सीम शिवभक्त आहे. हा प्रसंग सांगतना रवी म्हणाला की, “पर्वतावर त्याच क्षणी मला त्यांचे दर्शन झाले, तिथे मी त्यांना चालताना पाहिले. माझ भगवान शिवावर खूप प्रेम आहे शिवाय माझा त्यांच्यावर खूप विश्वासही आहे . असं म्हणत त्याने शिवावरील त्याचा विश्वास व्यक्त केला.