शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंगसाठी गुंतवणुक केल्यास कमी कलावधीत चांगल्याप्रकारे परतावा मिळेल असे अमिष दाखवून एका तरुणीची अज्ञात आराेपींनी ऑनलाइन तब्बल १७ लाख ६८ हजार रुपयांची आर्थिक फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आदिती धनंजय अवसरीकर (वय-२९,रा. शिवाजीनगर,पुणे) या तरुणीने व्हाॅट्सअप ग्रुप ५५० युबीएस इन्व्हेसटमेंट लर्निंग एक्सचेंज या ग्रुपचे अॅडमीन व मार्गदर्शक व विविध माेबाईल क्रमांक वापरकर्ते, वेगवेगळया बँकाचे खातेधारक यांचे विराेधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरचा प्रकार ३०/५/२०२४ ते २२/७/२०२४ यादरम्यान घडला आहे. अनाेळखी आराेपींनी तरुणीशी संर्पक करुन तिला शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला. गुंतवणुक केल्यास त्यावर कमी कलावधीत परतावा मिळेल असे देखील सांगितले. तिला एका व्हाॅट्सअप ग्रुप मध्ये सामावून घेऊन संगनमताने स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी युबीएस नावाचे अॅप प्ले स्टाेअर वरुन डाऊनलाेड करण्यास सांगितले. त्यात अकाऊंट तयार करायला सांगून शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करण्याच्या माध्यमातून थाेडीशी रक्कम देवून तिचा विश्वास संपादन केला. आराेपींनी दिलेल्य विविध बँक खाते क्रमांकावर रक्कम ट्रान्सफर करण्यास सांगून त्याबदल्यात काेणताही परतावा दिला नाही तसेच तिची मुळ रक्कमही परत न करता तिची फसवणुक केली आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलिस पुढील तपास करत आहे. घराचे कुलूप तोडून पाच लाखांचा ऐवज चोरीला घराचे कुलूप तोडून पाच लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना हडपसर परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अनंता पवार (वय ६२, रा. धारवाडकर काॅलनी, गोपाळपट्टी, मांजरी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवार कुटुंबीय दिवाळीनिमित्त गावी गेले होते. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले. बेडरूम मधील कपाट उचकटून चोरट्यांनी चार लाख ८७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. पवार कुटुंबीय सोमवारी गावाहून परतले. तेव्हा सदनिकेचे कुलूप तोडून चोरी झाल्याचे उघडकीस आले. पोलीस उपनिरीक्षक एस काळे पुढील तपास करत आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)