शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या अमिषाने 42 लाखांची ऑनलाइन फसवणूक:पुण्यात उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

2 hours ago 1
सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून काेट्यावधी रुपये नागरिकांचे आॅनलाइन लुबाडले जात असून त्यावर नियंत्रण करण्यास पोलिसांना अपयश आले आहे. अशाचप्रकारे पुण्यातील एका तरुणास शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक केल्यास अल्पावधीत चांगल्याप्रकारे परतावा मिळेल असे अमिष दाखवून त्याची 42 लाखांची आॅनलाइन आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत उत्तमनगर पोलिस ठाण्यात आराेपी प्रिया देसाई, राहुल निरंजन शहा व ब्लॅक राॅक पॅसेफिक फंड व्हाॅटसअपग्रुप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अजित राजेश ईप्पाकायला (वय-27,रा.शिवणे,पुणे) याने आराेपी विराेधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार 3/7/24 ते 1/9/24 यादरम्यान घडले आहे. तक्रारदार यांच्याशी आराेपींनी संपर्क करुन शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक केल्यास चांगला नफा मिळेल असे अमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर लिंक द्वारे ब्लॅक राॅक पॅसेफिक फंड हे अॅप्लीकेशन डाऊनलाेड करण्यास सांगुनत्यात गुंतवणुक करण्याकरिता त्यांचे विविध बँक खात्यात एकूण 43 लाख रुपये भरण्यास भाग पाडले. त्यापैकी एक लाख रुपयांचा परतावा त्यांना परत करण्यात आला मात्र, उर्वरित 42 लाख रुपये परत न करता सदर रकमेची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकास 17 लाखांचा गंडा वडगावशेरी येथे राहणाऱ्या कारमीन मायकल लाेबाे (वय-75) यांच्याशी फेसबुक या साेशल मिडियावर अमेरिकेतील डाॅ.माॅरसन हाॅस्पिटल मध्ये कार्यरत असल्याचे भासवून डाॅ.पॅट्रीक डेव्ह नावाच्या व्यक्तीने मैत्री केली. त्यांना तुम्हाला भेटण्यासाठी व कामानिमित्त भारतात येत असल्याची माहिती काॅल करुन सांगण्यात आली. त्यानंतर दिल्ली विमानळावर आल्यावर आपल्याला अमेरिकन डाॅलरची जास्त रक्कम असल्याने विमानतळावर अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच मला जामीनासाठी पैसे लागणार आहे असे खाेटे सांगून वेगवेगळया र्बंक खात्यात 17 लाख 93 हजार रुपये घेऊन सदर रकमेची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत आराेपीवर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article