शेतकरी बांधवांनो, वीज बिल भरू नका,15 दिवसांत शून्य बिल येईल:करमाळ्यात जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शेतकऱ्यांना शब्द‎

1 hour ago 1
केवळ लाडकी बहीण योजना आणली नसून, आमच्या लाडक्या भावांनाही समाधानी करण्याचे काम सरकारने केले आहे. महाराष्ट्रातील साडेसात हॉर्स पावर वीज वापरणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना मागील व पुढचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामध्ये ४४ लाख शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. शिवाय दूध दरातही सात रुपयांचे अनुदान दिल्याने लाडक्या भावाला समाधानी केले असल्याचे सांगत येणाऱ्या १५ दिवसात तुमच्या वीज बिलावर शून्य आकडा येणार असून, कोणीही वीज बिल भरू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करमाळा मंगळवारी जनसन्मान यात्रेप्रसंगी बोलताना केले. करमाळा तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यासह आमदार बबनराव शिंदे व आमदार संजयमामा शिंदे उपस्थित होते. तेव्हा गोविंदबापू पाटलांनी चप्पल घातली नव्हती करमाळा तालुक्यातील बंद पडलेले आदिनाथ व मकाई कारखाने पुन्हा एकदा सुरू करून वाढीव निधी देण्याचे काम आपण करू, असे जाहीर केले. त्यांनी अप्रत्यक्ष महायुतीतीलच बागल यांच्यावर टीका केली. आदिनामध्ून साखर बाहेर पडेपर्यंत यावेळी गोविंद पाटील यांनी चप्पल घातली नसल्याचीही आठवण उपमुख्यमंत्री पवार यांनी काढली. राष्ट्रवादीचे दिग्गज उपस्थित, मात्र ‘घड्याळ’ होते गायब राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत राहिले. मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला अध्यक्ष रूपाली चाकणकर असे सर्व दिग्गज नेते असताना व्यासपीठावर अथवा कार्यक्रमात राष्ट्रवादीचे घड्याळ हे चिन्ह कुठेच दिसले नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article