श्री रालतो विज्ञान महाविद्यालयामध्ये "स्वच्छता ही सेवा' अभियानात उपक्रम

1 hour ago 1
अकोला राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन श्री रा. ल. तो. विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले आहे. २० सप्टेंबरला प्रथम सत्रात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. डी. नानोटी यांच्या हस्ते उपस्थित स्वयंसेवकांना स्वच्छतेवर शपथ देण्यात आली. द्वितीय सत्रात मेरा युवा भारत पोर्टल व स्वच्छता ही सेवा या उपक्रमात घेण्यात येणारे कार्यक्रम या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून नेहरू युवा केंद्राचे संचालक महेशसिंग शेखावत उपस्थित होते. व्याख्यानात माय भारत पोर्टलचे महत्व व विद्यार्थ्यांना पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन महेशसिंग शेखावत यांनी केले. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सुधीर कोहचाळे यांनी केले. २२ सप्टेंबर रोजी स्वच्छता ही सेवा योजने अंतर्गत उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी शहरातील बस स्थानक, रेल्वे स्थानक, बाजार पेठ इत्यादी ठिकाणांमधून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा, प्लास्टिक बॉटलचे संकलन केले. कार्यक्रमाचे आयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. शैलेश जयस्वाल, डॉ. कविता हेडा यांनी केले. या उपक्रमासाठी गटप्रमुख प्रशीक शिरसाट, मुलींची गटप्रमुख साक्षी सरोदे, वसूरज गुळधे, पीयूष तायडे, वेदांत सोळंके, अजय दाभाळे, अंशुल तिलासी, अभय राठोड, जितेश निशानतराव, श्रुतिका भिंगारें, मृणाली जाधव आदींनी परिश्रम घेतले. स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत शहरातील विविध ठिकाणांवरून गोळा करण्यात आलेला कचरा.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article