श्री संत नरसिंग महाराज यात्रेला प्रारंभ, पाच आठवडे चालणार यात्रा:हजारो भाविकांच्या सहभागाने गोपाळकाला उत्साहात
5 hours ago
1
वऱ्हाडातील प्रसिद्ध संत श्री नरसिंग महाराज यात्रा महोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झाली. यात्रेचा मुख्य भाग असलेला दहीहंडी उत्सव व गोपाळकाला गुरुवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. संत श्री नरसिंग महाराज संस्थान वऱ्हाडातील चारही जिल्ह्यात प्रसिद्ध असून या संस्थेचा गोपाळकाला उत्सव दरवर्षी कार्तिक महिन्यात श्रेष्ठी या तिथीला साजरा केला जातो. गुरुवारी सकाळी ९ वाजता महाराजांची पालखी मंदिरातून नगर प्रदक्षिणाकरिता निघाली. कुटासा येथील अनंत देशमुख यांच्या नेतृत्वात वारकरी मंडळी पालखी यात्रेत सहभागी झाले होते. संस्थेचे अध्यक्ष सतीश व संदीप आसरकर यांच्या प्रमुख सहभागात पालखी शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून पालखी दुपारी चार वाजता सुमारास मंदिरात परत आली. नरसिंग महाराजांच्या पालखी यात्रेच्या स्वागतासाठी भाविक भक्तानी रस्त्यावर रांगोळ्या काढल्या होत्या. शिवाय अनेकांनी पालखीचे पूजन केले. सुरेश व्यवहारे यांच्या निवासस्थानी पालखीचे व वारकऱ्यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी वारकऱ्यांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. चोख पोलिस बंदोबस्त राहणार : शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार अमोल माळवे यांच्या नेतृत्वात शहर पोलिसांचा यात्रेसाठी चोख पोलिस बंदोबस्त राहणार आहे. साध्या वेशातील पोलिस यात्रेत राहणार असून महिला वर्गाच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची देखील गस्त राहणार आहे. ठिक-ठिकाणी अन्नदान : यात्रा महोत्सवानिमित्त मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते. गवळीपुरा चौकात अविनाश पालेकर व मित्र परिवाराच्या वतीने मोठ्या प्रमाणावर अन्नदान करण्यात येते दोनही ठिकाणी हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. पालखी मंदिरात परत आल्यावर अनंतराव देशमुख यांच्या नेतृत्वात सतीश व संदीप आसरकर यांच्या हस्ते गोपाळकाला व दहीहंडी उत्सव पार पडला. या उत्सवात गावातील विविध भजनी मंडळी सहभागी झाली होती. या यात्रेचा कालावधी पाच आठवड्याचा असून पाच ही आठवडे यात्रेमध्ये विविध वस्तूचे आणि खाद्यपदार्थांचे दुकाने लावली जातात. शिवाय लहान मुलांसाठी आकाश पाळणे आणि आनंद मेळावे सुद्धा भरवले जातात. यात्रा महोत्सवासाठी परिसरातील गावातून नागरिक येत असतात.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)