श्रीरामपूरच्या माजी आमदारावर अत्याचाराचा गुन्हा दाखल:राहुरी पोलिसांनी रात्री उशिरा निवासस्थानावरुन केली अटक

5 hours ago 1
श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी मुरकुटे यांना काल रात्री उशिरा त्यांच्या श्रीरामपूरमधील निवासस्थानावरून ताब्यात घेतले. त्यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. मुरकुटे यांच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांना अटक झाल्याचे समजताच सकाळी कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानासमोर जमले होते. राहुरी तालुक्यातील मांजरी येथील एका महिलेने राहुरी पोलिस ठाण्यात मुरकुटे यांच्या विरोधात अत्याचाराची फिर्याद दिली आहे. महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी मुरकुटे यांना अटक केली. भानुदास मुरकुटे हे कामानिमित्त मुंबईत होते. काल रात्री श्रीरामपूरमध्ये आल्यानंतर पोलिस चौकशीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. चौकशी झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. या सर्व प्रकारामुळे भानुदार मुरकुटे यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. भानुदार मुरकुटे यांची राजकीय कारकीर्द भानुदास मुरकुटे मागील 36 वर्षांपासून राजकारणात आहे. आपल्या राजकीय कारकीर्दी ते तीन वेळा श्रीरामपूरचे आमदार झाले आहेत. त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात पराभवाने झाली होती. भानुदार मुरकुटे यांनी 1978 मध्ये पहिल्यांदा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली, मात्र त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर 1980 मध्ये काँग्रेस (आय)कडून पहिल्यांदा विधानसभा लढले. यावेळी त्यांचा 25 ते 26 हजार मतांनी विजय झाला. भानुदार मुरकुटे मागील 36 वर्षांपासून अशोक सहकारी साखर कारखान सांभाळत आहेत. मध्यंतरी त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. हेही वाचा... राष्ट्रवादीचा अकोलेतील उमेदवार ठरला:विद्यमान आमदार किरण लहामटेंना पुन्हा संधी, अजित पवारांची जनसन्मान यात्रेत घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी किरण लहामटे यांना देण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेमुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीतील राज्यातील दुसरा उमेदवार ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. किरण लहामटे अकोलेचे विद्यमान आमदार आहेत. आता राष्ट्रवादीने त्यांना पुन्हा संधी दिली आहे. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article