गेल्या वर्षी किती टँकर होते सुरू!
2024 मागिल वर्षी 81.75 मि.मि. पावसाची नोंद झाली होती. यामुळे डिसेंबर ते ऑगस्ट या टंचाई काळात 40 गावे व 131 गावांना 31 टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला होता. या तुलनेत यंदा टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढलेली दिसत आहे.
पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी यंदा 2025 या वर्षी पंचायत समितीने ग्रामपंचायतीकडून आलेल्या टँकरच्या मागणी नुसार टंचाई आराखडा तयार करून जिल्हाधिकार्यांना सादर केला आहे. तीन महिने 36 गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार, अशी शक्यता गृहीत धरण्यात आली आहे.
कोणत्या गावांना टँकरची गरज
वरवंडी, चौधरवाडी, कुंभारवाडी, पानोडी, औरंगपूर, खरशिंदे, सावरगाव घुले, काकडवाडी, पिंपळगाव देपा, शेंडेवाडी, खंडेरायवाडी, मोधळवाडी, हिवरगाव पठार, नान्नज दुमाला, खांबे, पोखरी बाळेश्वर, कर्जुले पठार, गुंजाळवाडी पठार, सायखिंडी, माळेगाव पठार, सोनोशी, निमोण, भोजदरी, पेंमरेवाडी, डोळसणे, सादतपूर, रणखांबवाडी, दरेवाडी, पारेगाव बुद्रुक, पारेगाव खुर्द, तळेगाव दिघे, आजमपूर, औरंगपूर, हसनाबाद, जुने गावठाण, जांबुत बुद्रुक या गावांचा समावेश आहे.