संजय राऊत यांचे डोके फिरले आहे:त्यांना ठाण्याच्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करा, भरत गोगावलेंचा टोला

2 hours ago 1
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला आहे. यानंतर राज्यातील विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. या घटनेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. एका शिंदेचा एन्काऊंटर झालाय, दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर जनता करेल, असे त्यांनी म्हटले होते. या टीकेवरून आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. भरत गोगावले म्हणाले, संजय राऊत यांचे डोके फिरले आहे. त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला आहे. अक्षय शिंदेने केलेल्या पापाचे कृत्य जर भारताबाहेरच्या कुठल्या देशात असते, तर त्याला तिथल्या तिथेच गोळ्या घालून ठार केले असते. मात्र आपला देश संविधानावर चालतो, आपल्या देशात मजबूत कायदा सुव्यवस्था आहे. त्यामुळे कायद्यानुसारच ती शिक्षा झाली असती, असे भरत गोगावले म्हणाले. पुढे बोलताना भरत गोगावले म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गरिबांचे मसीहा आहेत. त्यामुळे राज्यातील जनता त्यांना पुन्हा सत्तेत बसवत मुख्यमंत्री करेल. त्यामुळे संजय राऊत यांच्या पोटात दुखत आहे. त्यातूनच ते मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे एन्काऊंटर करायला संजय राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील, असे गोगावले म्हणाले. काय म्हणाले होते संजय राऊत? संजय राऊत म्हणाले होते, राज्यात आणि देशात असे अनेक एन्काऊंटर आम्ही पाहिले आहे. मला जितकी अंडरवर्ल्डची माहिती आहे तेवढे गृहमंत्री आणि एन्काऊंटर करणाऱ्यांना देखील माहिती नाही. संस्थाचालक दोषी नसतील तर त्यांच्यावर पोस्कोअंतर्गत का गुन्हा दाखल केला आरोपीने आपल्या जबावात काही खुलासे केले होते म्हणून त्याचे एन्काऊंटर झाले. कुणाला तरी वाचवण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत. एका शिंदेने दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर केला. दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर जनता करेल, असे संजय राऊत म्हणाले होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article