Published on
:
26 Nov 2024, 1:49 pm
Updated on
:
26 Nov 2024, 1:49 pm
नवी दिल्ली : ‘संविधानाचे 75 वे वर्ष सर्वांसाठी गौरवास्पद आहे. देशात अनेक प्रकल्प सुरू आहेत. वेळेत पूर्ण होणारे प्रकल्प लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकतात. आजच्याच दिवशी 1949 रोजी राजेंद्र प्रसाद यांनी केलेल्या भाषणात राष्ट्र प्रथम ही घोषणा केली होती, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र यांनी केले. ते संविधान दिना निमित्त आयोजित सर्वोच्च न्यायालयातील कार्यक्रमात बोलत होते.
पीएम मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान भारताला आव्हान देणाऱ्या आतंकवादी संघटनांना जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा दिला. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी 26/11 हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच संविधान सभेच्या सदस्यांनाही अभिवादन केले.
पुढे बोलताना मोदी म्हणाले, आज भारत परिवर्तनातून जात आहे. संविधानाने सर्वांना विकासाचा रस्ता दाखवला आहे. जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदा संपूर्ण संविधान लागू झाले. संविधान निर्मात्यांना जाण होती की भारत नवीन स्वप्नांसह विकासात नवीन उंची गाठेल. त्यानुसार संविधान निर्मिती केल्याचे गौरोद्गार पीएम मोदी यांनी काढले.