सज्जनगडावर विष्णुपंचायतन यागाचा सोहळा:श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने अमृतमहोत्सवानिमित्त या सोहळ्याचे आयोजन
6 days ago
2
श्री समर्थ रामदास स्वामींची समाधी असलेल्या सज्जनगड येथे कार्तिक शुद्ध पौर्णिमा ते कार्तिक कृष्ण चतुर्थी म्हणजेच १५ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबरपर्यंत अमृतमहोत्सवी वर्षाचे निमित्त श्री विष्णुपंचायतन यागचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात अनेक ज्येष्ठ वैदिक, विद्वान आणि धार्मिक परंपरेतील अाध्यात्मिक पीठांचे पीठाधीश यांची उपस्थिती असणार आहे. श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने अमृतमहोत्सवानिमित्त या सोहळ्याचे आयोजन आयोजित करण्यात आले आहे. या महासोहळ्याचा प्रारंभ शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता वेदमूर्ती याज्ञिकांचे हस्ते जपानुष्ठानाच्या प्रारंभाने होणार आहे. त्यानंतर सकाळी ८ वाजता पंचायतन देवता व ग्रंथांची शोभायात्रा सज्जनगड येथे निघणार आहे. त्यानंतर सकाळी नऊ ते साडेदहा या वेळेत सज्जनगड येथे उभारण्यात आलेल्या या सोहळ्यानिमित्त श्रीराम मंदिर अयोध्येचे प्रतिकृती रूप असलेल्या भव्य सभामंडपात वाराणसी येथील प्रथम महाविभूती पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड यांचा प्रवेश होणार असून त्यानंतर सभामंडपात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे पूजन दीप प्रज्वलन शांती मंत्रांचे पठण आणि आशीर्वचन होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते साडेबारापर्यंत परमपूज्य परम मंदाकिनीताई गंधे यांचे प्रवचन होणार आहे. दुपारी ४ ते ६ या वेळेत पुणे येथील समर्थ भक्त मकरंदबुवा रामदासी यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. रात्री ९ वाजता नरसोबाची वाडी येथील पंडित कृष्णेंद्र वाडीकर यांची गायनसेवा होणार आहे. या सर्व सोहळ्यास उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन समर्थ सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. तलावाजवळ उभारले अध्योतील राम मंदिर श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने सज्जनगड येथे पिण्याच्या पाण्याचा तलावाजवळ उभारण्यात आलेल्या श्री अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचे काम अंतिम टप्प्यात आले असून अतिशय देखण्या अशा या मंदिर प्रांगणात हा सर्व सोहळा संपन्न होणार आहे. दरम्यान, गुरुवारी समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह योगेश बुवा रामदासी यांच्या हस्ते या प्रतिकृती असलेल्या मंदिर मंडपाची स्थलशुद्धी करण्यात आली. पाऱ्याजवळ ऐतिहासिक बुरुजाची भव्य कमान निरूपणकार आणि प्रवचनकार श्रीमती मंदाकिनीताई गंधे यांचे सज्जनगडावर आगमन झाले आहे. सज्जनगड येथील भातखळे येथे असलेल्या बसस्थानक आणि पायऱ्यांच्या प्रारंभी उभारण्यात आलेली ऐतिहासिक बुरुजाची भव्य कमान मंडप ही लक्ष वेधत असून या कमानीचे दोन्ही बाजूला असलेल्या जय-विजय यांच्या प्रतिकृती या लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. सज्जनगडावरील यज्ञशाळेत विष्णुपंचायतन यागाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली अाहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)