साखर कामगारांच्या वेतनवाढीसाठी त्रिपक्ष समितीची बैठक:साखर उद्योगापुढील अडचणी व साखर कामगाराचे वेतनवाढ व प्रलंबित प्रश्नावर चर्चा
4 hours ago
1
साखर कामगारांच्या वेतनवाढ व इतर प्रलंबित प्रश्नांसाठी गठीत केलेल्या त्रिपक्ष समितीची बैठक बुधवारी मुंबईत पार पडली. या बैठकीत साखर कामगारांच्या प्रश्नावर समाधानकारक चर्चा झाली. साखर कामगार संघटनेने ४० टक्के वेतनवाढीची मागणी केली. यामुळे सध्या साखर कारखान्यांत कामगारांचे थकीत वेतन इत्यादी बाबतची माहिती संकलित करून पुढील बैठकीस सादर केली जाईल. महिना अखेरीस परत बैठक आयोजित करण्याचे यावेळी ठरले. त्रिपक्ष समितीच्या बैठकीस समितीचे अध्यक्ष पी. आर. पाटील, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री राजेश टोपे, संगमनेर कारखान्याचे चेअरमन प्रताप ओव्हाळ, खासगी कारखान्याचे प्रतिनिधी अविनाश जाधव, कामगार संघटनेचे प्रतिनिधी तात्यासाहेब काळे, शंकरराव भोसले, राऊ पाटील, अविनाश आपटे, आनंदराव वायकर, पी. के. मुडे, सत्यवान शिखरे, शिवाजी औटी, प्रदीप बनगे, राजेंद्र तावरे, डी. एम. निमसे, युवराज रणवरे, मुळा कारखाना साखर कामगार युनियनचे अध्यक्ष अशोकराव पवार, तर शासन प्रतिनिधी त्रिपक्षीय समितीचे सदस्य सचिव कामगार कल्याण आयुक्त रविराज ईळवे, साखर आयुक्त कुणाल खेमनर हे ऑनलाईन बैठकीस हजर होते. कामगार आयुक्त मुंबई हे उपस्थित होते. यानंतर किमान चार बैठकीत वेतनवाढ व इतर मागण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सर्वानुमते ठरले. या चारही बैठका फेब्रुवारी अखेर घेण्याचे ठरले. या बैठकीत साखर उद्योगापुढील अडचणी व साखर कामगाराचे वेतनवाढ व प्रलंबित प्रश्नावर चर्चा झाली. पुढील बैठकीचे वेळ तारीख ठिकाण समितीचे सदस्य सचिव सर्वाना कळवतील. मुंबई येथे साखर कामगारांना ४० टक्के वेतनवाढीसाठी बैठक घेण्यात आली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)