साडेदहा तास रांगेत उभे राहिल्यावर लाडक्या बहिणींना मिळताहेत पैसे:प्रधान डाकघरमध्ये तीन दिवसांत 1350 महिलांना 52 लाख रुपयांचे वाटप‎

2 hours ago 1
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मंगळवारी (८ ऑक्टोबर) महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला. लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यात काही महिलांच्या खात्यात ४५०० तर काही महिलांच्या ७५०० रूपये जमा झाले. हे पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणींना प्रधान डाकघर येथे तब्बल साडे दहा तास रांगेत उभे रहावे लागत आहे. गेल्या तीन दिवसांत दर दिवशी ४०० ते ४५० महिलांना अशा एकूण १३५० महिलांना ५० लाख रुपयांचे प्रधान डाकघरमधून वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत राज्य सरकारकडून पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत तीन हप्त्यांचे साडेचार हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर, दिवाळीनिमित्त सरकारकडून भाऊबीज दिली जाणार आहे. त्यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे पैसे एकत्र जमा केले जात आहे. मंगळवारपासून (८ ऑक्टोबर) हे पैसे या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर जमा होत आहेत. हे पैसे काढण्यासाठी महिला सकाळीच शहरातील प्रधान डाकघर येथे रांगा लावत आहेत. सकाळी ९ वाजेपासूनच लाडक्या महिला रांगा लावत आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत ज्या महिला रांगेत आहेत. त्यांना पैसे देण्यात येतात. शेवटच्या महिलेला पैसे वाटप करेपर्यंत सायंकाळी ७.३० वाजतात. शहरातील प्रधान डाकघरमध्ये पैसे काढण्यासाठी लागलेली लाडक्या बहिणींची रांग. छाया : उदय जोशी. तांत्रिक अडचणीमुळे राहुरीहून नगरला आम्ही राहुरीतील पोस्ट बँकेत खाते उघडले आहे. मात्र बऱ्याच वेळा तेथे तांत्रिक अडचण येते. त्यामुळे प्रधान डाकघर येथे सकाळी ९ वाजेपासून रांगेत होते. दुपारी ४ वाजता पैसे मिळाले. - पूजा पोपळघट, महिला लाभार्थी, राहुरी एक काऊंटर व ६ पोस्टमन प्रधान डाकघरमध्ये केवळ अहिल्यानगर शहरातीलच नव्हे, तर शेजारच्या गावांतूनही महिला पैसे काढण्यासाठी येत आहेत. आम्ही दररोज ४०० ते ४५० महिलांना पैसे देत आहोत. या योजनेसाठी सुुरवातीला एक काऊंटर होते. मात्र महिलांची गर्दी लक्षात घेऊन ६ पोस्टमन या योजनेच्या पैसे वाटपासाठी बसवले आहेत. संजय बोंदर्डे, वरिष्ठ पोस्टमास्तर, प्रधान डाकघर, अहिल्यानगर. उशिरापर्यंत पैसे वाटप या योजनेंतर्गत पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणी सकाळपासून रांगा लावत आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत जितक्या महिला रांगेत त्यांना पैसे देण्यात येतात. हे काम सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत चालते. प्रधान डाकघरमधून मंगळवारपासून गुरुवारपर्यंत दररोज प्रत्येकी १५ ते २० लाखांचे वाटप करण्यात आले, असे तीन दिवसांत सुमारे ५० लाखांपर्यंत पैसे वाटप केल्याचे वरिष्ठ पोस्टमपास्तर बोंदर्डे यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article