साळशीत विनापरवाना सागवान लाकूड जप्त

2 hours ago 2

साळशी ः जप्त करण्यात आलेल्या लाकूड व गाडीसह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी.pudhari photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

31 Jan 2025, 1:15 am

Updated on

31 Jan 2025, 1:15 am

कणकवली ः देवगड तालुक्यातील साळशी येथे वन विभागाने विनापरवाना सागवानी इमारती लाकडाची वाहतूक करणार्‍या बोलेरो पिकअपला पकडत गोल इमारती नग लाकूड जप्त केले. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावंतवाडी उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सहायक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड, कणकवलीचे वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड वनपाल श्रीकृष्ण परीट, मिठबांव वनरक्षक आप्पासाहेब राठोड, ठाकूरवाडी वनरक्षक रामदास घुगे यांनी ही कारवाई केली. सागवानी इमारती लाकडांच्या नगांची बोलेरो पिकअपमधून वाहतूक होताना ही कारवाई केली.

लाकडासह गाडी जप्त करून माल फोंडा विक्री आगार येथे ठेवला. याप्रकरणी दिगंबर गावकर (78, रा. साळशी), संजय वळंजू (57, रा. रेंबवली), संकेत तर्फे (27, रा. कुवळे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल श्रीकृष्ण परीट करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article