साहित्यिकांनी सामाजिक ऐक्याचे रक्षण करावे- प्रशांत गावंडे:प्रतिभा साहित्य संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा

1 hour ago 1
संत आणि महापुरुषांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करून समाजाला घडवण्याचे कार्य केले. परंतु, काही काही शक्ती सत्याला दडपून समाजाला बिघडवण्याच्या कामी लागली आहेत. अशावेळी साहित्यिकांनी निर्भयपणे लिहून देशातील राजकीय व सामाजिक परिस्थितीचे सत्य प्रकाशात आणून सामाजिक ऐक्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत शेतकरी लोकजागर मंचचे अध्यक्ष प्रशांत गावंडे यांनी व्यक्त केले. अकोट येथील वसुंधरा इंग्लिश हायस्कूलमध्ये प्रतिभा साहित्य संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी सुभाषराव ठेंग होते. उद्घाटन गजानन देशमुख यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. श्रीकृष्ण काकडे, अॅड. गजानन पुंडकर, अरुण काकड, कवी विठ्ठल कुलट, गोपाल कोल्हे आदी उपस्थित होते. पुरस्कार वितरणानंतर कवी गजानन मते यांच्या सूत्रसंचालनात शेतकरी कविसंमेलन झाले. यात "उत्सव पिकपाण्याच्या कथा-कवितांचा' या राज्यस्तरीय स्पर्धेतील पुरस्कार प्राप्त कवी व लेखकांनी रचना सादर केल्या. यावेळी प्रतिभा साहित्य संघाचे पदाधिकारी व रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अरूण सांगळोदकर, अरविंद लहाने, प्राचार्य शिवचरण नारे, जिल्हाध्यक्ष अरूण काकड, राजेंद्र ठाकरे, अरुण मोडक आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विशाल कुलट, सचिव सागर तळोकार यांनी तर अनंत कुलट यांनी आभार मानले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article