सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची सुद्धा:छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर, पोलिसांना फ्री हँड देण्याची सूचना

5 days ago 5
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवरुन छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्याची देखील आहे, असे भुजबळ म्हणाले. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. अशात छगन भुजबळ यांनीही सरकारला घरचा आहेर दिला आहे. पोलिसांना फ्री हँड दिला पाहिजे, अशी सूचना देखील भुजबळ यांनी दिली आहे. ते नाशिकच्या येवल्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. छगन भुजबळ म्हणाले, बाबा सिद्दीकी यांची हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंग आहे. 10-12 हजारांत पोरं हत्या करतात. पोलिसांना फ्री हँड दिला पाहिजे. मी तुमच्या पाठीमागे उभा राहिल. तुम्ही काय करतात हे मी विचारणार नाही. पण जे कोणी गुन्हेगार आहेत, त्यांची विल्हेवाट लावा. मात्र ही केवळ गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्यांची देखील जबाबदारी आहे, असे भुजबळ म्हणाले. दबाव आणला तर पोलिस काम कसे करणार? पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, पोलिस खात्यात योग्यप्रकारचे अधिकाऱ्यांची नेमणूक केली पाहिजे. योग्य अधिकारी कोण आहेत, याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना माहिती असते. कुणाला घेतले पाहिजे, कुणाला बाहेर ठेवले पाहिजे, याबाबत त्यांना माहिती असते. त्यांच्यावर आम्ही दबाव आणला, तर पोलिस खाते कसे काम करणार, असा सवाल भुजबळ यांनी केला आहे. मुंबई पोलिसांसाठी एक चॅलेंज बाबा सिद्दीकी यांना अनेक वर्षांपासून ओळखत होतो. त्यांना धमकी मिळाल्यानंतर वाय सुरक्षा देण्यात आली होती. पण फक्त सुरक्षा देऊन काही होत नाही. धमकी कोणी दिली याचा तपास करणे गरजेचे होते. भायकळा येथील तालुका प्रमुखांची देखील निघृ्ण हत्या झाली होती. या हत्या म्हणजे मुंबई पोलिसांसाठी एक चॅलेंज आहे, असे छगन भुजबळ म्हणाले. बाबा सिद्दीकी यांची काल रात्री झाली हत्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची काल रात्री अज्ञात तरुणांनी गोळीबार करत त्यांची हत्या केली. वांद्रे पूर्व भागातील खेरनगर येथील राम मंदिर परिसरात ही घटना घडली. काल रात्री फटाके वाजवत असताना तीन ते चार तरुणांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. गोळी लागल्यानंतर बाबा सिद्दीकी यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. यातील एक युपीचा, तर दुसरा हरियाणाचा आहे. तर, तिसरा आरोपी फरार आहे. हेही वाचा... बाबा सिद्दिकी घड्याळे दुरुस्त करायचे:विद्यार्थी नेता म्हणून राजकारणाला सुरुवात; तीन वेळा आमदार, या वर्षीच काँग्रेस सोडली महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असलेले राष्ट्रवादीचे (अजित गट) नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री ९.१५ वाजता मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांचे पूर्ण नाव बाबा झियाउद्दीन सिद्दीकी होते. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article