सुदामा चरित्र कथेने भागवत कथेचा समारोप, न्हावी गावात निघाली दिंडी:शास्त्री भक्तिस्वरुपदास यांनी केले निरूपण, भाविकांना महाप्रसाद वाटप

3 hours ago 2
न्हावी येथे सुरू असलेल्या श्रीमद भागवत सप्ताह ज्ञान यज्ञ पारायणाची मंगळवारी सायंकाळी सांगता झाली. शेवटच्या दिवशी सुदामा चरित्र कथा सांगण्यात आली. त्यात प्रसंगानुरूप सजीव देखावे सादर करण्यात आले. सायंकाळी दिंडी आणि महाप्रसादाने कथेचा समारोप झाला. कथा समारोपाच्या दिवशी मूळ न्हावी व सध्या गुजरात येथे रहिवासाला असलेले कथेच्या मुख्य यजमान सुनीता हेमचंद्र भोगे, राहुल व भूषण भोगे कुटुंबीयांसह उपस्थित होते. सुदामा चरित्राचे निरूपण करताना वक्ताश्री शास्त्री भक्तिस्वरुपदास म्हणाले की, आपण भगवंताला फुल नव्हे तर फुलाची पाकळी दिली पाहिजे. तीन मुठी पोहे दिले तरी तो भगवान आपल्याला सर्वस्व देतो हे सुदामा कथेतून समजते. आपण परमेश्वराला दोन हातांनी देतो. पण, त्या बदल्यात परमेश्वर आपल्याला हजार हातांनी परत करतो. कारण, त्याचा दयाळू स्वभाव आहे. भगवंताच्या हिश्शाचे फुटाणे सुदामाने खाल्ले होते. त्या कर्मामुळे त्याच्या नशिबी दारिद्रय आले होते. त्यामुळे कोणीही देव-मंदिर, देश, समाज, गोरगरिबांची संपत्ती हडपू नये. आपले हे चुकीचे कर्म संपूर्ण परिवार अडचणीचे ठरू शकतात, असे शास्त्री भक्तीस्वरूपदास म्हणाले. दुपारी सर्व श्रोत्यांना महाप्रसाद देण्यात आला. सायंकाळी गावातून दिंडी सोहळा निघाला. त्यात स्वामिनारायण भजनी मंडळ व गावातील महिला, मुलींनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. दांडिया रास खेळून आनंद घेतला. या संपूर्ण कार्यक्रमात सभासंचालन व संहिता वाचन शास्त्री अनंतप्रकाशदास यांनी केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article