शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर महायुतीमध्ये मतभेद?:तिजोरीवरील ताण पाहता अजित पवारांचा विरोध; तर जाहीरनाम्यातील आश्वासन खोटे होते का? म्हणत राऊतांची टीका

4 hours ago 1
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रकरणावर महायुतीमध्ये मतभेद असल्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यातच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली नव्हती. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडणारा ताण पाहता अर्थमंत्री असलेले अजित पवार यांचा शेतकरी कर्जमाफीला विरोध असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान सर्वच राजकीय पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांची कर्जमाफी होताना दिसत नाही. याआधी झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वर देखील अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राज्यात वादंग उठण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीपूर्वी दिलेला आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची तयारी भाजपच्या वतीने केली जात आहे. मात्र, या कर्जमाफीला आता अर्थमंत्री अजित पवार यांचा विरोध असल्याचे बोलले जात आहे. राज्याच्या तिजोरीवर यामुळे मोठा भार पडणार आहे. त्यामुळे राज्याचे आर्थिक गणित बिघडू शकते, हे पाहता अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीला विरोध केला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार? विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार? याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री असल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे. त्यानुसार आता भारतीय जनता पक्ष कर्जमाफीचा निर्णय कधी घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवारांच्या हाती तिजोरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिलेले नव्हते. वास्तविक महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, आमच्या पक्षाच्या वतीने तसे कोणतेच आश्वासन दिलेले नसल्यामुळे अजित पवार यांचा या शेतकरी कर्जमाफीला विरोध असल्याचे बोलला जात आहे. त्यातच राज्याच्या तिजोरीची चाबी ही अजित पवार यांच्या हातात आहे. राज्यातील आर्थिक गणिते बिघडणार नाही, याची काळजी अजित पवार यांच्या वतीने घेतली जात आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यास मोठा ताण महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अजित पवार यांचा या कर्जमाफीला विरोध आहे, असे बोलले जात आहे. लाडकी बहिण योजनेचा ताण विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्य सरकारच्या वतीने लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली होती. या योजनेमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर या आधीच मोठ्या प्रमाणात ताण असल्याचे दिसून येत आहे. या योजनेसाठी राज्य सरकारला अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करावी लागली होती. त्यामुळे इतर अनेक योजनांचा पैसा लाडकी बहिणी योजनेसाठी वापरण्यात आला आहे. आता शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यास राज्य सरकारला आणखी आर्थिक ताण सहन करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संजय राऊत यांची टीका शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा हा भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यातच उपस्थित करण्यात आला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात तीन लाख रुपयांपर्यंतची शेतकरी कर्जमाफी करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार? याची प्रतीक्षा महाराष्ट्रातील जनता करत असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा किंवा आमचा जाहीरनामा खोटा होता, हे जनतेला सांगा, असे आव्हान संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला दिले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article