सैफ अली खान हल्ला प्रकरणPudhari Photo
Published on
:
18 Jan 2025, 11:56 am
Updated on
:
18 Jan 2025, 11:56 am
पुढारी ऑनलाईन डेस्क :
अभिनेता सैफ अलिखान याच्यावर चाकू हल्ला प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मध्यप्रदेशमधून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याची सध्या चौकशी सुरु असून पोलिसांनी याबाबत अधिक माहिती दिलेली नाही. पण याप्रकरणात पोलिस हे ॲक्शन मोडवर आलेले दिसत आहेत. झी न्यूज ने याबाबत वृत्त दिले आहे.
पोलिसांनी या प्रकरणात तपास करण्यासाठी ३५ टीम तयार केल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्याकडून तपास सुरु आहे. काल बांद्रा येथे हल्लेखोर रेल्वेस्टेशनजवळील एका सिसिटिव्ही मध्ये दिसून आला होता. त्यांने हल्ला करुन पळून जाताना कपडे बदलले असल्याचे या फुटेजवरून लक्षात येते. तसेच दादर येथे एका मोबाईलच्या दुकानात संशयित आरोपी हेडफोन खरेदी करत असल्याचे दिसत आहे.