​​​​​​​सैफवर हल्ला करणारा अन् अटक झालेला आरोपी एकच आहे का?:नाना पटोले यांचा सवाल; मुंबई पोलिसांकडे खुलासा करण्याची मागणी

4 hours ago 1
अभिनेता सैफ अली खानवर त्यांच्या घरातच मध्यरात्री हल्ला झाल्याने मुंबईत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला अटक केल्याचे जाहीर केले आहे, परंतु CCTV मध्ये दिसलेला हल्लेखोर व अटक करण्यात आलेला व्यक्ती यांच्यात साम्य दिसत नाही असा दावा एका वृत्तपत्राने केला आहे, या प्रश्नी मुंबई पोलिसांनी खुलासा करावा व सत्य जनतेसमोर मांडावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. दिव्य मराठीने एका न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा दाखला देत सैफ अली खानच्या घरात दिसलेली व्यक्ती व अटक करण्यात आलेला आरोपी वेगवेगळा असल्याचा दावा केला आहे. यामुळे एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. टिळक भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मुंबईतील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या वांद्रे भागात अभिनेत्याच्या घरात हल्ला झाल्याने सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत तसेच गावातील सरपंचही सुरक्षित नाहीत तर राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचे काय? हा कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न असून निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना महत्वाच्या पदावर बसवून सरकार काम करत आहे त्याचासुद्धा हा परिणाम आहे. सैफवरील हल्ला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सैफ अली खानवरील हल्ल्याने बॉलिवूडमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सैफवरील हल्ला हा हिंदू मुस्लीम नसून तो सुरक्षेचा व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, परंतु सत्ताधारी भाजपातील काही लोक त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी भाजपा सरकारनेच सीबीआय चौकशी केली होती, आजपर्यंत सीबीआयने त्यांचा अहवाल दिला नाही. भाजपा सरकार हिंदू सुशांतला न्याय देऊ शकले नाही असेच म्हणावे लागले. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीतही सत्ताधारी भाजपा धार्मिक अजेंडा राबवत असेल तर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे पटोले म्हणाले. लाडकी बहीण योजनेवरूनही सरकारवर टीका विधानसभा निवडणुकीवेळी भाजपा युतीने लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा करत सर्व भगिणींना प्रति महिना १५०० हजार रुपये दिले पण आता या योजनेचा लाभ चुकीच्या लोकांनी घेतला, या योजनेत त्रुटी आहेत. बांग्लादेशींनीही लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याचा साक्षात्कार सरकारला झाला आहे. योजना सुरु करताना सरकारला त्रुटी दिसल्या नाहीत का? बांग्लादेशींनी या योजनेचा लाभ घेतला तर हे बांग्लादेश भारतात, महाराष्ट्र आले कसे? केंद्रात मागील ११ वर्षांपासून ५६ इंच छातीवाल्या मोदींचे सरकार आहे. मग मोदी सरकार कमजोर आहे, असे भाजपाला म्हणायचे आहे का? असा प्रश्न विचारून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या सरकारवरच गुन्हा दाखल केला पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले. दिव्य मराठीचे यासंबंधीचे विशेष वृत्त वाचा... सैफच्या घरात दिसलेली व्यक्ती आणि अटक आरोपी वेगवेगळे:फॉरेन्सिक लॅबचा दावा - जो व्यक्ती CCTV मध्ये दिसला तो पोलिसांच्या ताब्यात नाही नवी दिल्ली - 16 जानेवारीच्या रात्री अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या फ्लॅटमध्ये हल्ला झाला होता. सकाळी पोलिसांनी संशयित आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध केले. तीन दिवसांनंतर, 19 जानेवारी रोजी मुंबई पोलिसांनी घोषित केले की सैफचा हल्लेखोर मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आहे आणि त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचा चेहरा आणि शरीफुलचा चेहरा जुळत नसल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. पोलिसांच्या दाव्यादरम्यान शरीफुल हाच खरा हल्लेखोर होता का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हे जाणून घेण्यासाठी दिव्य मराठीने फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली. सैफ अली खानच्या घराच्या पायऱ्यांवर दिसलेल्या व्यक्तीचे सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांनी अटक केलेला आरोपी शरीफुलचा फोटो आम्ही घेतला. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article