Sonam kapoor | सोनम कपूर रॅम्प वॉक करताना हात जोडून ढसाढसा रडलीfile photo
Published on
:
02 Feb 2025, 4:25 am
Updated on
:
02 Feb 2025, 4:25 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : Sonam kapoor |अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) बऱ्याच काळापासून कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही, पण ती कोणत्या ना कोणत्या कारणाने नक्कीच चर्चेत असते. अलिकडेच सब्यसाचीच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सोनम कपूर दिसली होती. आता पुन्हा एकदा सोनम कपूर चर्चेत आहे. सोनम कपूरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती खूप भावनिक दिसत आहे. रॅम्पवर चालताना सोनम अचानक हात जोडून ढसाढसा रडू लागली.
...अन् सोनम कपूर ढसाढसा रडली
गुरुग्राममध्ये दिवंगत डिझायनर रोहित बाल यांना समर्पित फॅशन कार्यक्रमात सोनम कपूरने (Sonam Kapoor) रॅम्प वॉक केला. रोहित बाल यांना श्रद्धांजली वाहताना सोनम कपूर भावूक झाली. रॅम्पवर चालताना तिला अश्रू आवरता आले नाहीत. रॅम्पवर रडत चालतानाचे तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रोहित बाळ यांचे १ नोव्हेंबर २०२४ रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले, ज्यामुळे फॅशन इंडस्ट्रीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सोनमही रोहित बाळ यांची आठवण काढून रडू लागली. सोनमच्या या व्हिडिओवर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.