Published on
:
07 Feb 2025, 10:57 am
Updated on
:
07 Feb 2025, 10:57 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : Steve Smith Record : स्टीव्ह स्मिथ श्रीलंकेच्या भूमीवर एकामागून एक मोठे विक्रम करत आहे. अलीकडेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर, तो आता आशिया मैदानांवर ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने या बाबतीत रिकी पॉन्टिंगला मागे टाकले आहे. स्मिथने दुसऱ्या कसोटीत अर्धशतक झळकावले आहे. तो पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौ-यात ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करत आहे.
स्मिथच्या नावावर आणखी एक मोठी कामगिरी
स्मिथ कसोटी क्रिकेटमध्ये अशा टप्प्यावर पोहोचला आहे जिथे तो प्रत्येक चांगल्या खेळीसह विक्रम मोडत आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात स्मिथच्या नावावर आणखी एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. तो आशियामध्ये खेळताना ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने या बाबतीत रिकी पॉन्टिंगला मागे टाकले आहे.
आशियामध्ये फलंदाजी करताना पॉन्टिंगने 28 कसोटी सामन्यांच्या 48 डावांमध्ये 41.97 च्या सरासरीने 1889 धावा केल्या. तर स्मिथने फक्त 42 डावांमध्ये हा टप्पा पार केला. शतकांच्या बाबतीतही स्मिथ पॉन्टिंगपेक्षा एक पाऊल पुढे आहे. पॉन्टिंगच्या नावावर 5 कसोटी शतके आहेत, तर स्मिथच्या नावावर 7 शतके आहेत. या यादीत अॅलन बॉर्डर 1799 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
आशियामध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या यादीत स्मिथ, पॉन्टिंग आणि अॅलन बॉर्डर यांची नावे टॉप 5 मध्ये आहेत. बॉर्डरने 22 सामन्यांच्या 39 डावात 54.51 च्या सरासरीने 1799 धावा केल्या आहेत. चौथ्या स्थानावर मॅथ्यू हेडनचे नाव आहे, ज्याने 19 सामन्यांच्या 35 डावात 1663 धावा केल्या आहेत. यानंतर, उस्मान ख्वाजा 15 सामन्यांच्या 30 डावांमध्ये 1580 धावांसह पाचव्या स्थानावर आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 141 धावा करणा-या स्मिथ दुसऱ्या सामन्यातही चांगली फलंदाजी करत आहे. त्याने पुन्हा शतक पूर्ण केले आहे. ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेन लवकर बाद झाल्यानंतर, स्मिथने उस्मान ख्वाजासोबत मिळून ऑस्ट्रेलियन डाव सावरला आणि अर्धशतकी भागीदारी केली.
ख्वाजा बाद झाल्यानंतर स्मिथने चौथ्या विकेटसाठी अॅलेक्स कॅरीसोबत शतकी भागीदारी केली. स्मिथने त्याच्या डावात आतापर्यंत 9 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.
ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत सर्वाधिक झेल (विकेटकीपर नसलेले)
स्मिथ त्याच्या कारकिर्दीतील 116 वा कसोटी सामना खेळत आहे. या काळात त्याने 220 डावांमध्ये 197 झेल घेतले आहेत. तर रिकी पॉन्टिंगने त्याच्या कारकिर्दीत खेळलेल्या 168 कसोटी सामन्यांपैकी 328 डावांमध्ये 196 झेल घेतले. या यादीत मार्क वॉ तिसऱ्या, मार्क टेलर चौथ्या आणि अॅलन बॉर्डर पाचव्या स्थानावर आहेत. राहुल द्रविडने कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक झेल घेतले आहेत. या भारतीय दिग्गजाने 164 कसोटी सामन्यांमध्ये 210 झेल घेतले.
स्टीव्ह स्मिथ : 197 विकेट्स
रिकी पॉन्टिंग : 196 विकेट्स
मार्क वॉ : 181 विकेट्स
मार्क टेलर : 157 विकेट्स
अॅलन बॉर्डर : 156 विकेट्स
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर श्रीलंकेचा संघ 257 धावांवर सर्वबाद झाला.