स्वबळाच्या घोषणा करून गमावले ‘वंचितां’चे बळ:मतदार खेचण्याची रणनीती आखू शकतात

2 hours ago 1
महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्यापैकी सामर्थ्य असलेल्या पक्षाशी युती करण्याची संधी होती. ती प्रकाश आंबेडकरांनी नाकारून स्वबळावर निवडणूक लढल्याने वंचितांचे बळ गमावले. ताकदवान मित्रपक्ष शोधण्यात अपयश अपेक्षित मित्रपक्ष मिळवू शकले नाही. शिवाय प्रकृती अस्वास्थ्याचेही कारण असल्याने यश मिळाले नाही. 1 वंचित बहुजन आघाडी आणि अजित पवार गटाची विधानसभेसाठी युती व्हावी, या प्रस्तावाला प्रतिसाद दिला नाही. 2 उद्धवसेनेसोबत लोकसभेच्या वेळी युतीचा प्रयत्न झाला. पण तो प्रत्यक्षात आलाच नाही. ३ काँग्रेसकडे वळलेला आदिवासी, बहुजन समाज पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी ठोस मोर्चेबांधणी केली नाही. 4 पक्षातील नव्या पिढीच्या कार्यकर्त्यांना रोखून धरण्यात, नवे मुद्दे देण्याकडे दुर्लक्ष होत आहे. लोकसभेला जागावाटपासाठी महाविकास आघाडीशी अखेरच्या क्षणापर्यंत बोलणी केली आणि स्वतंत्रपणे लढले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, अशी ठाम भूमिका घेत स्वतंत्रपणे निवडणूक लढली. अपेक्षित मित्रपक्ष मिळवू शकले नाही. शिवाय प्रकृती अस्वास्थ्याचेही कारण असल्याने यश मिळाले नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article