हर घर संविधान उपक्रमांतर्गत मनपात संविधान उद्देशिकेचे वाचन:भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण
14 hours ago
1
हर घर संविधान उपक्रमांतर्गत महापालिकेत मंगळवारी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सवांतर्गत ‘हर घर संविधान’ कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना शासनाने दिल्या. त्या अनुषंगाने मनपामध्ये २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता संविधान दिनाचे औचित्य साधून मनपाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृह येथे संविधान उद्देशिकाचे सामुहिकरित्या वाचन करून ‘‘हर घर संविधान’’ उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. मनपा अधिकारी-कर्मचाऱ्यांन ी वाचन केले. महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थी, पालक, मुख्याद्यापक आणि शिक्षक, शिक्षिकांनी सामुहिकरित्या संविधान उद्देशिकाचे वाचन केले. यावेळी मनपा शहर अभियंता नीला वंजारी, मुख्य लेखा अधिकारी जे.एस.मानमोठे, सहाय्यक आयुक्त धनश्री पवार, क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजय पारतवार, दिलीप जाधव, महानगरपालिका सचिव अमोल डोईफोडे, आयुक्तांचे स्वीय्य सहाय्यक जितेंद्र तिवारी आदी उपस्थित होते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)