हरित ऊर्जा क्षेत्रात सन 2030 पर्यंत 25 लाख काेंटीची:तर पारंपारिक तेल व वायू क्षेत्रात 21 लाख काेटींची नवीन गुंतवणुक हाेईल - डाॅ.प्रमाेद चाैधरी

2 days ago 1
ऊर्जा संक्रमण अाणि हवामान कृती (ईटीसीए) याची सध्या जागतिक पातळीवर दखल घेतली जात असून यात प्रामुख्याने ब्लू व ग्रीन हायड्राेजन, ग्रीन अमाेनिया यांची निर्मिती व वेस्ट टू एर्न्जी साेल्यूशन्स यासारख्या गाेष्टीचा समावेश अाहे. अागामी काळात या क्षेत्रास माेठी चालना मिळणार असून सन २०३० पर्यंत हरित ऊर्जा क्षेत्रात जगभरातील प्रमुख कंपन्या या सुमारे २५ लाख काेटी रुपयांची गुंतवणुक करण्याची शक्यता अाहे. तसेच पारंपारिक तेल अाणि वायू क्षेत्रात पुढील दहा वर्षात २१ लाख काेटी रुपयांची नवीन गुंतवणुक हाेईल असे मत इथॅनाॅल मॅन अशी अाेळख असलेले प्राज कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष डाॅ,प्रमाेद चाैधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्राज बायाेएनर्जी बिझनेसचे अध्यक्ष अतुल मुळे अाणि तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष घनशाम देशपांडे उपस्थित हाेते. डाॅ.चाैधरी म्हणाले, दी कार्बन अाॅफसेटिंग अँड रिडक्शन स्कीम फाॅर इंटरनॅशनल एव्हीएशन या करारानुसार जागतीक पातळीवर युराेपियन युनियन अाणि अमेरिकेने सस्टेनेबल एव्हीएशन फ्युएल (विमानाचे इंधन) मधील मिश्रणाचे लक्ष्य अनुक्रमे ६ % व १० % ठेवले अाहे. तर भारताने २०२७ पर्यंत १ % अाणि २०२८ पर्यंत २ % मिश्रणाचे लक्ष्य ठेवले अाहे. त्यामुले सस्टेनेबल एव्हीएन फ्युएल निर्मीतीत नवीन संधीचे दरवाजे उघडले अाहे. एअर एशिया , प्राच अाणि इंडियन अाॅईल यांच्या एकत्रित यशस्वी प्रयत्नामुळे शुभर माेलॅसिसपासून तयार करण्यात अालेल्या स्वदेशी बनावटीच्या एसएएफवर चालणाऱ्या देशातील पाहील्या व्यवसायिक प्रवासी विमानाने पुणे ते नवीन दिल्ली प्रवासाचे काही महिन्यापूर्वी यशस्वी उड्डाण केले अाहे. प्राजने माॅडयुलरायझेशन साेल्युशन मागणीची पूर्तता करण्यासाठी माॅडयुलरायझेशन मध्ये प्रभावी अभियांत्रिकी क्षमता विकसित केली अाहे. कर्नाटकातील मंगलाेर येथे अत्याधुनिक उत्पादन सुविधा सुमारे ४०० काेटी रुपये खर्च करुन १२३ एकर मध्ये प्रकल्प सुरु केला असून यातून भविष्यात वार्षिक दाेन ते अडीच हजार काेटी रुपयांचा महसूल याद्वारे मिळवणे शक्य अाहे. प्राजचे सध्याचे उत्पन्न वार्षिक तीन हजार ४०० काेटी रुपये असून २०३० पर्यंत हे दहा हजार काेटी रुपयांपर्यंत पाेहचविण्याचे अामचे उद्दिष्ट अाहे. सध्या यात निर्यातीचा वाटा २९ टक्के असून येत्या काही वर्षात ताे ५० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा अामचा निर्धार अाहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article