हिंगोलीत सकल मराठा समाजाच्या वतीने आमरण उपोषण सुरू:मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा, 15 जणांचे ठिय्या आंदोलन

2 hours ago 2
आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देत हिंगोलीत सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारपासून ता. 22 आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. यावेळी 15 नागरिकांनी ठिय्या आंदोलन देखील सुरु केले आहे. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल अशी भुमीका यावेळी घेण्यात आली आहे. हिंगोली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते बालाजी वानखेडे (पुर), रमेश जाधव (इडोळी), परमेश्‍वर तांबिले (वाघजाळी), त्र्यंबक लोंढे (लाख), ज्ञानेश्‍वर जगताप (इसापूर रमना) यांनी आज दुपारी साडेबारा वाजल्यापासून उपोषण सुरु केले आहे. यावेळी सुनील पाटील गोरेगावकर, माधव कोरडे यांच्यासह पंधरा जणांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरु केलेल्या उपोषणाला हिंगोली जिल्हयातील सकल मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक गावातून उपोषणाची तयारी सुरु करण्यात आली असून आज हिंगोलीत उपोषण व ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याची भुमीका यावेळी घेण्यात आली आहे. या शिवाय ठिय्या आंदोलनात दररोज पंधरा ते वीस नागरीक सहभागी होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणी बाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article