हिवाळ्यात आहारात फळांचा वापर करा:शरीरातील रक्तप्रवाह राहते सुरळीत, हृदयावर येणार नाही ताण

1 hour ago 1
निरोगी आणि स्वस्थ आयुष्य जगायचे असेल तर तसा नियमित आहारही हवा. आजकाल वेळेची कारणे देत अनेक जण केवळ जंक फूड खाण्याकडे वळले आहेत. हे शरीरासाठी घातक आहेच मात्र फक्त बाहेरचे अन्नपदार्थ खाऊन उपयोग नाही. शरीर निरोगी ठेवण्यासाठी तसा समतोल राखणेही आवश्यक आहे. हा समतोल राखण्यासाठी रोज किमान एक तरी फळ खाणे गरजेचे आहे. कोणत्याही आजारापासून चार हात लांबच राहायचे असेल, तर फळे खाण्याशिवाय पर्याय नाही. ज्या ऋतूत जी फळे येतात ती खाल्ल्याने तुम्ही निरोगी आणि प्रसन्न राहू शकता. फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात असतात. फळांमुळे रोगप्रतिकारकशक्ती तर वाढतेच सोबतच डोळे निरोगी राहतात आणि पचनक्रियाही सुधारते. त्यामुळे हिवाळ्यात आहारामध्ये फळांचा वापर करणे गरजेचे असल्याचे आहारतज्ज्ञांनी सांगितले आहे. हिवाळ्यात खावी अशी फळे थंडीत फ्लू तसेच इतर आजार लगेच पसरतात. अशावेळी फळांमुळे जीवनसत्वे जास्तीत जास्त मिळतात. कधीही आजारी पडल्यावर डॉक्टरही नेहमी फळे खाण्याचाच सल्ला देतात. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. ती वाढवण्यासाठी जास्तीत जास्त फळे खाणे हात एक त्यावर सर्वात मोठा रामबाण उपाय आहे. सफरचंद : ताजी आणि रसरशीत सफरचंद हिवाळ्यात विक्रीस येतात. सफरचंदात भरपूर फायबर, जीवनसत्वे सी आणि के असतात. यामुळे शरीर आजारांपासून दूर राहते. सफरचंदाचा रस सुध्दा घेतला तरी चालतो. शरिरासाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर असतात. सीताफळ : सीताफळ अनेकांना आवडत नाही. मात्र थंडीत सीताफळ आवर्जुन खावे. सीताफळमध्ये व्हिटॅमिन ६ चे प्रमाण अधिक असते. विशेषकरून लहान मुलांसाठी सीताफळ अत्यंत गुणकारी आहे. डाळिंब : थंडीच्या दिवसात डाळिंबाचाही हंगाम असतो. डाळिंबाचे दाणे खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. डाळिंब रक्त पातळ करते, ज्यामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहते. थंडीत त्वचा कोरडी पडते यासाठी डाळिंब गुणकारी आहे. पेरू : पेरूमध्येही व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंटचे घटक आढळतात. पेरूमुळे शरीर कोणत्याही संसर्गाशी सामना करण्यास तयार होते. संत्री : संत्री हा व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. संत्री रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लाभदायक ठरते. त्यातच डिसेंबरमध्ये येणारी संत्री ही चवीला अत्यंत गोड असतात. मात्र सर्दी, खोकला झाला असल्यास शक्यतो संत्री खाणे टाळावे. नागरिकांनी हे लक्षात घ्यावे कोणतेही फळ हे स्वयंपूर्ण असा आहार आहे. त्यामुळे फळ खाण्यापूर्वी आणि खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास जेवण करू नये. फळामध्ये असलेले सर्व जीवनसत्वे शरीराला मिळणे गरजेचे आहे. म्हणून रिकाम्या पोटी फळ खाणे कधीही चांगले. -डॉ. अविनाश दिवे, आहारतज्ज्ञ.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article