राज्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाल्यापासून सत्ताधारी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर सरकारी यंत्रणा आणि पैशांचा गैरवापर सुरु आहे. आदर्श आचारसंहिता आणि नियम डावलून मतदारांना पैशांचे वाटप सुरू आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे यांना मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या घटनेवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल केला आहे.
महाराष्ट्रात भाजपनं पराभव मान्य केला आहे. यामुळं त्यांनी पैसे वाटप करणं सुरु केलं आहे. भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांनी एका मतदारसंघात जाऊन पैसे वाटणं याचं उदाहरण आहे. कितीही पैसे वाटले तरी भाजप महायुती राज्यात विजय मिळवू शकणार नाही. महाराष्ट्राची जनता सत्तापरिवर्तन करणार आहे, असं काँग्रेसने म्हटले आहे. राहुल गांधी यांनी या घटनेवरून थेट नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन विनोद तावडे आणि बविआच्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत राहुल गांधी यांनी विनोद तावडे प्रकरणी प्रश्न उपस्थित केले आहेत.नरेंद्र मोदीजी हे पाच कोटी कुणाच्या SAFE मधून निघाले आहेत. जनतेचे पैसे लुटून कुणाला टेम्पो पाठवला होता, असा सवाल राहुल गांधी यांनी केला.
BJP के राष्ट्रीय महासचिव विनोद तावड़े महाराष्ट्र के एक होटल में पैसे बांटते हुए पकड़े गए हैं।
विनोद तावड़े बैग में भरकर पैसे लेकर गए थे और वहां पर लोगों को बुला-बुलाकर पैसे बांट रहे थे।
ये खबर जब जनता को पता चली तो भारी हंगामा हो गया। पैसों के साथ विनोद तावड़े के कई वीडियो… pic.twitter.com/iqbMcGJtyQ
— Congress (@INCIndia) November 19, 2024
मतदानापूर्वी पैसे वाटून जनतेचे मतपरिवर्तन करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यात त्यांना यश येणार नाही. याप्रकरणी विनोद तावडे यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक करण्यात याली. त्यांच्यावर खटला चावण्यात यावा. ज्यांनी पैसे वाटले आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे गटाकडून पैसे वाटले जात आहेत. त्याची चौकशी केली जावी, अशी मागणी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.