हैद्राच्या उरुसला संदल मिरवणुकीने प्रारंभ, आज प्रसाद:891 व्या उरूस निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, कव्वालीचा मुकाबलाही रंगणार
1 hour ago
2
तालुक्यातील हैद्रा येथील ख्वाजा पीर सैफुल मुलक दर्गात उरूसास बुधवारी संदल मिरवणुकीने प्रारंभ झाला. उरुसनिमित्त २७,२८ व २९ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यकमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टीचे चेअरमन एम.डी रफीक सिराजोद्दीन मुजावर यानी केले. अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा येथील हिंदु - मुस्लीम एक्याचे प्रतिक असलेले सुप्रसिद्ध ख्याजा पीर सैफुल मुलक दर्गाचे उरुसनिमित्त बुधवारी सायंकाळी दर्गाहपासून संदल मिरवणूक निघाली. यात हिंदु मुस्लिम समाजबांधव सहभागी झाले होते. गुरुवार, २८ रोजी गंध लावणयाचा कार्यक्रम पार पडणार आहे. हजारो वर्षाच्या परंपरेप्रमाणे कर्नाटक येथील करजगी गावचे पाटील परीवाराच्या घरातुन गंध निघणार आहे. तसेच सायंकाळी ६ वाजता चिराग ( दिवा ) चा कार्यक्रम तर रात्री ९ वाजता गोरखपुर युपी, येथील नुसरत खानम व पुनाचे कामील चिश्ती यांचा कव्वालीचा मुकाबला होणार आहे. दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी पर्यंत महाप्रसाद चालु राहणार आहे. दर्गाहात सलग तीन दिवस कार्यक्रम चालणार असुन या ऊरुसमध्ये हिंदू - मुस्लीम बांधव मोठया संख्येने उपस्थित राहणार आहे. पत्रकार परिषदेस व्हा.चेअरमन बंदेनवाज तालाबअली मुजावर, सेक्रेटरी वकील नबीसाब मुजावर,ट्रस्टी अहमद कादरबाशा मुजावर,ट्रस्टी अ.रउफ अहमदसाब मुजावर,ट्रस्टी बंदेनवाज शिराजोद्दीन मुजाव उपस्थित होते. दर्शनासाठी देश व परदेशातून येतात भाविक देश-परदेशातून येणाऱ्या भाविक भक्तांचा हैद्रा येथे प्रचंड गर्दी होत असते.धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी प्रत्येक व्यक्ती, कुटुंब व समाज घटक येवून पवित्र दर्ग्यात नवस बोलतात व नवस फेडण्यासाठी लोकसमुहाचा वर्दळ उरूसच्या काळात पाहवयास मिळत असते.सात ते आठ हजार लोकवस्तीच्या हैद्रा या गांवात ख्वाजा पीर सैफुल मुलक दर्गा प्रसिध्दीस आला आहे.सर्व जाती धर्माचे प्रतिक म्हणून या दर्ग्याकडे पाहिले जाते. भाविक भक्तांचा भावनांचा आदर दर्गाह ट्रस्टीकडून जोपासले जातो.कर्नाटक,महाराष् ट्र सीमेवर वसलेले तीर्थक्षेत्र हैद्रा येथील प्रसिध्द ख्वाजा पीर सैफुलमुलक दर्ग्याचे हजारो वर्षापासून चालत आलेले परंपरा करजगी (कर्नाटक) येथील पाटील या कुटुंबाकडून गंध च्या माध्यामातून येवून परंपरा अविरतपणे चालू असल्याची माहिती दर्गाह ट्रस्टीचे चेअरमन एम.डी रफीक सिराजोद्दीन मुजावर यांनी दिली आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)