३ दिवसांपेक्षा अधिक राहण्यास मनाई, ७ घरातूनच भिक्षा...महाकुंभात किती प्रकारचे संन्यासी, जाणून घ्याFile Photo
Published on
:
24 Jan 2025, 5:33 am
Updated on
:
24 Jan 2025, 5:33 am
प्रयागराज : पुढारी ऑनलाईन
दशमानी नागा सन्यासी आदि शंकराचार्यांकडून स्थापित एक विशिष्ट परंपरेचा भाग आहेत. ते सन्यासींना चार विभागात विभाजित करते. ही फक्त एका परंपरेचे वर्गीकरण नाही तर, ते संन्यासिंच्या अध्यात्मिक उन्नतीचा आधारही आहे. या संन्यासींचे वर्गीकरण कुटीचक, बहुदक, हंस आणि परमहंस अशाप्रकारे वर्गीकरण करण्यात येते. दरम्यान आतापर्यंत १०.२१ कोटी भाविकांनी प्रयागराजच्या पवित्र संगमामध्ये स्नान केले. या विषयीची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली.
महाकुंभाच्या आयोजनामुळे प्रयागराजची चर्चा जगभरात होत आहेत. या मोठ्या धार्मिक आयोजनामध्ये दशमानी नागा संन्यासियांच्या परंपरांचे खास महत्व आहे. हे सन्यासी ना फक्त सनातनची रक्षा करतात, तर अध्यात्माची ते प्रेरणाही आहेत. या परंपरांच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्वाला इतिहासकार यदुनाथ यांनी आपल्या पुस्तकांमध्ये स्पष्टपणे नोंदवले आहे. याचे लेखक धनंजय चोपडा यांनी देखील त्यांच्या 'भारत मे कुंभ' या पुस्तकात सांगितले आहे.
कुटीचक : हे संन्याशी संसारिक मोह-मायेतून पुर्णपणे मुक्त होउन जंगलामध्ये एक कुटी बनवून राहतात. धार्मिक चिंतन, पूजा आणि ध्यानामध्ये ते वेळ व्यतीत करतात. ते कोणत्याही यात्रेत किंवा सामाजिक गोष्टींमध्ये सहभाग घेत नाहीत. त्यांना भिक्षेमध्ये जे मिळते त्यावर ते समाधान मानतात.
बहुदक : बहुदक संन्याशी हे भ्रमणशील असतात. भिक्षेतून ते फक्त अन्न ग्रहण करतात. त्यांच्यासाठी कोणत्याही एका जागी तीन दिवसांपेक्षा अधिक काळ थांबणे हे वर्जित असते. ते आपल्या यात्रेच्या माध्यमातून धर्माचा प्रचार करतात. त्यांचा उद्देश हा देशाटन असतो. हे संन्याशी अविरतपणे भ्रमण करत असतात.
हंस : हंस संन्याशी वेदांमध्ये पारंगत असतात. त्यांचा उद्देश हा परब्रम्हाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त करण्याचा असतो. ते योगाभ्यास आणि भिक्षेवर अवलंबून असतात. ते समाजाला अध्यात्मिक शिक्षा प्रदान करतात.
परमहंस : परमहंस अध्यात्मिक विकासची सर्वोच्च स्थिती आहे. असे मानण्यात येते की या स्तरातील संन्याशियांनी मोक्ष प्राप्त केलेला असतो. ते परब्रम्हामध्ये लीन झालेले असतात. त्यांना मानव समाजाचा सर्वोच्च शिक्षक आणि अध्यात्मिक ज्ञान परम आचार्य मानले जाते. वर्तमानात यांनाच महामंडलेश्वर आणि आचार्य महामंडलेश्वर हे पद प्रदान करण्यात येते.
दशनामी नागा संन्याशांचे वर्ग
दशनामी नागा संन्याशांचे प्रमुख दोन वर्ग असतात. त्यातील एक आहे शस्त्रधारी, हे संन्यासी शास्त्रांचा सखोल अभ्यास करतात. अध्यात्मिक, धार्म्रिक आणि वैचारिक विकासावर लक्ष केंद्रीत करतात. ते समाजाला अध्यात्मिक आणि धार्मिक ज्ञान प्रदान करतात.
शस्त्रधारी नागा संन्याशी धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी हाती शस्त्र धारण करतात. हे शस्त्र चालवण्यामध्ये ते पारंगत असतात. त्यांचा उद्देश सनातन धर्माचे रक्षण करणे हा असतो. परिस्थितीनुसार ते शास्त्र आणि शस्त्र या दोन्हीचा उपयोग करतात.
महाकुंभात दशनामी नागा संन्याशांची उपस्थिती अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या सुरक्षेचे प्रतिक आहेत. हे संन्यासी पेशवाई दरम्यान आपले शस्त्र आणि पारंपरिक वेशभूषेसह आपल्या आखाड्याची प्रतिष्ठा दाखवतात. ते धार्मिक प्रवचन आणि योग साधनेच्या माध्यमातून श्रद्धाळूंना मार्गदर्शन करतात.
महाकुंभात दशनामी नागा संन्याशांचे नेतृत्वाचे केंद्र महामंडलेश्वर आणि आचार्य महामंडलेश्वर असते. हे पद त्यांना अध्यात्मिक योग्यता आणि आखाड्यातील योग्यतेनुसार प्रदान करण्यात येतो.
संन्यासी साठींचे महत्वाचे नियम :
भिक्षाटनासाठी जाताना संन्याशांने दोन वस्त्रांमध्ये असावे. एक वस्त्र कमरेच्या खाली आणि गुडघ्याच्या वरच्या भागात असावे. दुसरे वस्त्र खांद्यावर असावे.
कोणत्याही संन्याशाला सातहून अधिक घरात भिक्षा मागण्याची मनाई आहे. हा नियम कुटीचक यांच्यासाठी नाही.
संन्याशाने रात्री-दिवस यातील कोणत्याही एकाच वेळी अन्न ग्रहण करावे.
संन्याशाने बस्तीपासून लांब आपली कुटी बनवावी.
संन्याशाने भूमीवरच शयन करावे.
संन्यासी न कोणाला अभिवादन करेल, न कोणाची प्रशंसा करेल, ना कोणाची निंदा
तो केवळ आपल्या श्रेष्ठ आणि आपल्या आधीच्या संन्याशांनाच प्रणाम करेल.
संन्यासी फक्त भगव्या रंगाचे कपडे घालतील.