भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यातच मालिकेचा निकाल लागला. कारण भारताने पहिला आणि दुसरा सामना जिंकला होता. त्यानंतर तिसरा सामना इंग्लंडच्या पारड्यात गेला. त्यामुळे मालिका विजयासाठी भारताला , तर मालिका बरोबरीत आणण्यासाठी इंग्लंडला चौथ्या सामन्यातील विजय महत्त्वाचा होता. या दृष्टीने इंग्लंडने जोरदार प्रयत्न केले होते. पण सर्व प्रयत्न 119 व्या चेंडूवर फसले. खरं तर इंग्लंडने भारतावर दुसऱ्या षटकापासून दबाव टाकला होता. भारताच्या 79 धावांवर पाच विकेटही गेल्या होत्या. त्यामुळे फार काही मोठी धावसंख्या होईल असं वाटत नव्हतं. पण अष्टपैलू शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांनी डाव सावरला. या सामन्यात हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे या जोडीने सहाव्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. यामुळे इंग्लंडला चांगलाच घाम फुटला. हार्दिक पांड्या 53 धावांवर बाद झाला. त्यामुळे शेवटच्या दोन षटकात शिवम दुबेला बाद करण्याचं आव्हान होतं. पण शिवम दुबे शेवटच्या चेंडूवर धावचीत झाला पण तिथपर्यंत इंग्लंडचा पराभव जवळपास पक्का करून गेला होता. इंग्लंडने शेवटचं जेमी ओव्हर्टनला सोपवलं होतं. या षटकातला पाच चेंडू त्याने बाउंसर टाकला. 20 व्या षटकातला पाचवा चेंडू म्हणजेच 119 वा चेंडू त्याने 141.3 किमी प्रति तास वेगाने टाकला. हा चेंडू शिवम दुबेच्या हेल्मेटवर जोरात आदळला. त्यामुळे इंग्लंडच्या नशिब फुटलं.
ओव्हर्टनने शिवम दुबे जवळ आणि विचारलं की बरा आहे ना.. तेव्हा दुबेने सकारात्मक प्रतिसाद दिला. पण हेल्मेटला चेंडू जोरात लागल्याने कन्सक्शन चाचणी झाली. त्यामुळे त्याच्याऐवजी भारताला गोलंदाजी करताना कन्सक्शन सब्सिट्यूट म्हणून हार्षित राणाची निवड करता आली. हार्षित राणाने यापूर्वी आयपीएलमध्ये आपली छाप सोडली होती. पण कन्सक्शन सब्सिट्यूट टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि नव्हत्याचं होतं केलं. हार्षित राणाने 4 षटकं टाकली आणि 33 धावा देत 3 महत्त्वाचे विकेट काढले. त्यामुळे इंग्लंडला पराभव निश्चित झाला. हार्षितने लियाम लिविंगस्टोन, जेमी ओवर्टन आणि जेकब बेथेलची विकेट काढली.
पुण्यात पराभवानंतर जोस बटलर पत्रकार परिषदेला सामोरं गेला. ‘ही लाइक टू लाइक रिप्लेसमेंट नव्हती. आम्ही याच्याशी सहमत नाहीत. एकतर शिवम दुबने गोलंदाजीचा वेग 25 किमी प्रतितासाने वाढवला आहे. किंवा हार्षितने आपल्या फलंदाजीत सुधारणा केली आहे. हा खेळाचा एक भाग आहे आणि आम्हाला हा सामना जिंकणं आवश्यक होतं. पण आम्ही निर्णयाने असहमत आहोत.’, असं इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर म्हणाला.