दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली आणि रेल्वे यांच्यातील रणजी ट्रॉफी सामन्यादरम्यान तीन चाहत्यांनी मैदानात घुसखोरी करत विराटला भेटण्याचा प्रयत्न केला. (Image source- X)
Published on
:
01 Feb 2025, 11:20 am
Updated on
:
01 Feb 2025, 11:20 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली आणि रेल्वे यांच्यातील रणजी ट्रॉफी सामन्यादरम्यान आज (दि.१) पुन्हा एकदा सुरक्षेत मोठी चूक झाली. याच सामन्याच्या पहिल्या दिवशीही एका चाहत्याने मैदानात घुसखोरी करत विराटला भेटण्याचा प्रयत्न केला होता.
तीन चाहत्यांची मैदानावर घुसखोरी
साधारणपणे रणजी करंडक सामन्यांना तुडूंब गर्दीही अपवादात्मक असते. मात्र तब्बल १२ वर्षानंतर टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली रणजी खेळण्यासाठी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर उतरला. यामुळे दिल्ली विरुद्ध रेल्वे सामना पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी उसळली होती. विराटच्या उपस्थितीमुळे सामन्याला कडक सुरक्षा व्यवस्था होती, परंतु तरीही, तीन चाहते २० हून अधिक रक्षकांना चकवा देत मैदानात प्रवेश केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी तिघांनाही लगेच ताब्यात घेतले. सामन्याच्या पहिल्या दिवशीही एका चाहत्याने मैदानावर येऊन भारतीय सुपरस्टारचे पाय स्पर्श करण्यात यश मिळवले.
दिल्लीने केली रेल्वेवर मात
रणजी सामन्यात दिल्लीने रेल्वेचा एक डाव आणि १९ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना रेल्वेने पहिल्या डावात २४१ धावा केल्या. उपेंद्र यादव (९५), कर्ण शर्मा (५०) आणि हिमांशू सांगवान यांनी (२९) धावांचे योगदान दिले. दिल्लीचा पहिला डाव ३७४ धावांवर संपला. कर्णधार आयुष बदोनीने ९९ धावा केल्या, तर सुमित माथूरने ८६ धावा केल्या. कोहलीला केवळ ६ धावा करता आल्या. दुसऱ्या डावात दिल्लीकडे १३३ धावांची आघाडी होती. रेल्वेचा दुसरा डाव ११४ धावांवर संपला. दिल्लीने एक डाव आणि १९ धावांनी रेल्वे संघावर विजय मिळवला.