केंद्रीय अर्थसंकल्पातून करदात्यांना मोठा दिलासा देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. ज्यांचे उत्पन्न 12 लाखांपर्यंत आहे, आशा व्यक्तींना करमुक्त करण्यात आलं आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला असून त्यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर मोदी सरकार करदात्यांना पावले असल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून करदात्यांना मोठा दिलासा देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. ज्यांचे उत्पन्न 12 लाखांपर्यंत आहे, आशा व्यक्तींना करमुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या या कररचनेच्या घोषणेनंतर सर्वसामान्य आणि नोकरदारवर्गाला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केल्याने सरकारला एक लाख कोटींचा तोटा होणार आहे. नव्या कररचनेनुसार 0 ते 4 लाख उत्पन्नावर 0 टक्के कर, 4 लाख ते 8 लाखा वर 5 टक्के, 8 लाख ते 12 लाखा वर 10 टक्के, 12 लाख ते 16 लाखा वर 15 टक्के, 16 लाख ते 20 लाखा वर 20 टक्के आणि 20 लाख ते 24 लाखांवर 25 टक्के कर आकारण्यात येईल. तर 24 लाखाच्या पुढे 30 टक्के कर आकारण्यात येणार आहे. पूर्वी तुमचं उत्पन्न 10 लाख असेल तर तुम्हाला 50 हजार कर भरावा लागत होता. तर आता तुम्हाला कोणताही कर द्यावा लागणार नाही त्यामुळे तुमचा 50 हजारांचा फायदा होणार आहे.
Published on: Feb 01, 2025 04:44 PM