2019 ची घटना जनता विसरलेली नाही:जनतेच्या अपक्षेविरुद्ध सरकार स्थापन झाले होते - CM शिंदे, मतदान करण्याचे केले आवाहन
1 day ago
1
राज्यातील जनता 2019 ची घटना विसरलेली नाही. त्यावेळी जनतेच्या अपेक्षेविरुद्ध आणि चुकीच्या पद्धतीने सरकार स्थापन झाले होते. गेल्या पाच वर्षांत या राज्याची दशा कुणी केली आणि दिशा कुणी दिली, हे लोकांना माहीत आहे. महायुतीचे सरकार बहुमताने येईल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. तसेच जास्तीत जास्त लोकांनी मतदार करण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे येथील वागळे इस्टेट येथील एलिमेंट आयटी पार्क येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी सौ. लता शिंदे, सून सौ. वृषाली शिंदे आणि शिंदे कुटूंबातील इतर सदस्यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? मागील पाच वर्षांचा कारभार जनतेने पाहिला आहे. 2019 मध्ये मतदान झाल्यानंतर जी घटना घडली ती महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही. त्यावेळी जनतेच्या अपक्षेविरुद्ध आणि चुकीच्या पद्धतीने सरकार स्थापन झाले होते. गेल्या पाच वर्षांत या राज्याची दशा कुणी केली आणि दिशा कुणी दिली, हे लोकांना माहीत आहे. महायुतीचे सरकार बहुमताने येईल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. जनता विकासाला मतदान करतील
राज्याचा केलेला विकास, सुरू केलेल्या कल्याणकारी योजना लोकांना माहीत आहेत. गेल्या पाच वर्षांत राज्याला विकासाकडे नेण्यासाठी महायुतीने प्रयत्न केला, याचे मला समाधान आहे. त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ आणि आमचाही अडीच वर्षांचा कार्यकाळ लोकांनी पाहिला आहे. अडीच वर्षांत थांबवलेला विकास महायुतीने पुन्हा सुरू केला. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता विकासाला मतदार करतील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. लोकांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे आजचा दिवस लोकशीच्या उत्सवाचा दिवस आहे. महाराष्ट्राला उज्वल भवितव्याकडे आणि देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाणारा हा उत्सव आहे. त्यामुळे या उत्सवात सर्व मतदारांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. हे ही वाचा... राज-शर्मिला ठाकरेंचे मतदान:'अमित'च्या रुपाने चांगला उमेदवार मिळाल्याचा आनंद; तर तावडेंच्या प्रकारावर राज यांचे मौन आमच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस असल्याचे राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी म्हटले आहे. अमित ठाकरे यांच्या रुपाने मतदारसंघाला एक चांगला उमेदवार लोकांना मिळाला, याचा आनंद त्यांना वाटत असल्याचा दावा देखील त्यांनी केला. त्यामुळेच येथील मतदार हे आमच्यासाठी संवाद साधत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सविस्तर बातमी वाचा...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)