50 हजार मोबाइल स्कॅन, तरी गँगरेपमधील आरोपी सापडेनात:रात्रीच्या वेळी पुण्यातील टेकड्यांवर वर्दळ कमी

2 hours ago 1
कोंढवा परिसरात सासवडकडे जाणाऱ्या बोपदेव घाटामध्ये ६ दिवसांपूर्वी मध्यरात्री बारा वाजता ुूरतवरून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या एका २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर तीन जणांनी कोयत्याचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केल्या धक्कादायक प्रकार घडला होता. याप्रकरणात आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची तब्बल ६० पथके कार्यरत आहेत. ५० हजार मोबाइलचा डाटा पोलिसांनी आतापर्यंत स्कॅनिंग केला असून येरवडा कारागृहातील काही कैद्यांकडे देखील गुन्ह्याबद्दल काही माहिती आहे का याची चौकशी केली. मात्र, त्यानंतरही सामूहिक बलात्कार गुन्ह्यातील आरोपींचा थांगपत्ता अद्याप पोलिसांना लागलेला नाही. दरम्यान, बोपदेव घाटातील घटनेनंतर पुण्यातील विविध टेकड्यांवर रात्रीच्या वेळेस फिरण्यास जाणाऱ्या जोडप्यांसह नागरिकांची गर्दी कमी झाली असल्याचे दिसून येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपींची माहिती जाहीर करत १० लाखांचे बक्षीस माहिती देणाऱ्यास जाहीर केलेले आहे. तसेच आरोपींचे रेखाचित्र प्रसिद्ध करून जबरी चोरी, विनयभंग, दरोडा, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यातील ४००-४५० आरोपीची झडती आतापर्यंत घेण्यात आली आहे. दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेले सराईत आरोपींची सखोल चौकशी करण्यात येत असून वेगवेगळ्या टेकडीवरील गुन्ह्यात सहभागी आरोपीची देखील चौकशी करण्यात आलेली आहे.घटनास्थळ परिसरातील दोन्ही बाजूचे आठ ते दहा किलोमीटरपर्यंतचे सर्व ढाबे, वाइन शॉप, पेट्रोल पंप , हॉटेलमध्ये देखील कसून तपासणी करण्यात आली आहे. घटनास्थळ परिसरात मोबाईल नेटवर्क योग्य नसल्याने तसेच घाटाच्या परिसरात सीसीटीव्ही संख्या नगण्य असल्यामुळे त्याचप्रमाणे उपलब्ध सीसीटीव्ही मधील दृश्यमानता कमी असल्याने तपासात अडथळे येत असल्याचे सांगण्यात आले आहे. परिसरातील तब्बल ४५ गावांत केली चौकशी ग्रामीण भागातील सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यासाठी सासवड पोलिस, राजगड पोलिस त्याचसोबत पुणे ग्रामीण एलसीबी पथक यांची देखील मदत घेण्यात आली आहे. घटनास्थळ परिसरातील सुमारे ४५ गावात पोलिस पथके जाऊन त्यांनी गावातील सराईत गुन्हेगार नेमके कुठे आहेत, गावात बाहेरील गुन्हेगार कोणी आले आहेत का , अवैध दारू ,गांजा विक्री करणारे कोण आहेत, याबाबतची खातरजमा सुरू केली आहे. फेरीवाल्यासह बांधकाम कामगारांकडेही विचारपूस वेगवेगळ्या वस्तू विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांकडे देखील पोलिसांनी तपास केला आहे, मात्र, आरोपींबाबत कोणतीही ठोस माहिती त्यांना उपलब्ध होऊ शकलेली नाही. सदर भागात बांधकाम व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणांवर काम करणाऱ्या मजुरांकडे देखील तपास पथकाकडून चौकशी करून मजुरांची माहिती एकत्रित करण्यात आली.मात्र, त्यात देखील फारशी उपयोगी माहिती उपलब्ध झालेली नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article