सोयगाव मोक्षगंगा कॉलनीत सिमेंट रस्त्याखालून पाणी, आरोग्य धोक्यात:रस्ते खोदताना फुटलेले नळ दुरुस्त न करताच काँक्रीट रस्ते‎

2 hours ago 1
मालेगाव शहरात सिमेंट काँक्रीट रस्ते बनवताना आधीचे डांबरी रस्ते खोदले गेले. यात अनेक ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना तडे गेले. मात्र दुरुस्ती न करताच त्यावर काँक्रीटचे रस्ते झाले. अशाच प्रकारे शहरातील पेन्शन भवनजवळील मोक्षगंगा कॉलनीत पाच-सहा महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. यावर्षी चांगला पाऊस झाला. गिरणा धरण शंभर टक्के भरले आहे. शहरातील नागरिकांसाठी वर्षभराकरिता मुबलक पाणी साठा असेल. मात्र तालुक्याच्या ग्रामीण भागात उन्हाळ्यात दरवर्षी अनेक गावाना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. महापलिका क्षेत्रात पिण्याच्या पाण्याचे महत्त्व फारसे लक्षात घेतले जात नाही. रस्ते काँक्रीट करण्यासाठी खोदकाम करतांना तुटलेल्या जलवाहिन्या तशाच सोडून त्यावर सिमेंट टाकले गेले. आता फुटक्या जलवाहिनीतील पाणी दबावाने वाट मिळेल तिथून बाहेर पडत आहे. या पाणी गळतीमुळे परिसरात पाण्याचे डबके साचून डासांची पैदास वाढत आहे. पाण्यामुळे सिमेंट रस्त्यांच्या दुतर्फा चिखल होत आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे महापालिका पाणीपुरवठा विभागाने लवकरात लवकर होणारी पाणी गळती रोखावी, अशी मागणी होत आहे. जबाबदारी कोणाची? करोडो रुपये खर्चातून सिमेंट काँक्रीट रस्ते होत आहेत.मात्र काम करताना मोठ्या जलवाहिन्या अथवा अर्धा उंची पाइप तुटत असतील तर त्यावर पक्का रस्ता बनवला गेला आहे. अशा ठिकाणी कायमच पाण्याची गळती राहिली तर रस्ताही फुटेल. त्यामुळे निष्काळजीपणामुळे झालेल्या कामाची जबाबदारी निश्चित करून कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पाच ते सहा महिन्यांपासून पाणी गळती पाच ते सहा महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम करत असताना पाण्याचा पाइप फुटला. त्यावरच रस्ता बनवला गेला. पाच ते सहा महिन्यांपासून पाणी गळती सुरू आहे. पाणी दारात आल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. यातच साठणाऱ्या पाण्यात डासांची पैदास झाली आहे. - देवा साळुंखे,

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article