चांदवड-देवळा तालुका विकास आघाडीची स्थापना:निवडणुका स्वबळावर लढविणार; पदाधिकाऱ्यांची माहिती

2 hours ago 1
शिवसेना शिंदे गटाचे माजी तालुकाप्रमुख विकास भुजाडे यांना संघटनेने अचानक पदमुक्त केल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याने नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत सर्वानुमते पक्षविरहित ‘चांदवड-देवळा तालुका विकास आघाडी’ची स्थापना केली असून आगामी सर्व निवडणुका आघाडीतर्फे स्वबळावर लढविण्यात येणार असल्याची माहिती विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष विकास भुजाडे, मार्गदर्शक निवृत्ती घुले, खर्डेचे सरपंच संदीप पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भुजाडे यांनी शिवसेना तालुकाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शिवसेनेत १८६ बूथप्रमुख व ४ हजार शिवदूतांची नेमणूक करून मोठे संघटन उभारल्याचे सांगून यातील बहुतांश पदाधिकारी, कार्यकर्ते या आघाडीसोबत असल्याचा दावा केला. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी व विकासकामे करण्यासाठी तसेच स्वतंत्र अस्तित्वासाठी या आघाडीची स्थापना करण्यात आल्याचे सांगून यावेळी आघाडीच्या १०१ पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तसेच आघाडीच्या वतीने तालुक्यात गट-गणनिहाय पदाधिकारी, कार्यकर्ते व गावोगावी विकासदूतांची नेमणूक करण्यात येणार आहे. तालुक्यात गट-गणनिहाय दौरा करुन लवकरच विकासदूत मेळावा घेऊन आगामी विधानसभा निवडणूकीत स्वतंत्र उमेदवार उभा केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी आघाडीतील कार्याध्यक्ष दत्ता गांगुर्डे, सरचिटणीस मुकेश कोतवाल आदींसह पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article