जैन विद्यालयात विद्यार्थ्यांना सर्पांबाबत प्रबोधन:‘भारतीय सर्पांची ओळख’ कार्यशाळेचे आयोजन; स्लाइड शोच्या माध्यमातून माहिती

2 hours ago 1
येथील श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सामाजिक वनीकरण विभाग चांदवड, चांदवड तालुक्यातील सर्प अभ्यासक व विद्यालयातील हरित सेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय सर्पांची ओळख’ या प्रबोधनात्मक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली. पृथ्वीवरील नामशेष होत जाणाऱ्या विविध सजीवांच्या प्रजाती आणि ढासळत जाणारा पर्यावरणाचा समतोल यामध्ये एकसूत्रीपणा यावा आणि पृथ्वीचे आणि पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन व्हावे, या उद्देशाने १९५२ मध्ये इंडियन बोर्ड ऑफ वाइल्ड लाइफ या संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर दरवर्षी दि. १ ते ७ ऑक्टोबर हा आठवडा वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त विद्यार्थ्यांना भारतीय सापांची ओळख या प्रबोधनात्मक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत नाशिक येथील सर्प अभ्यासक विक्रम कडाळे, किरण देशमाने, आसिफ पटेल, अनिस सय्यद, मुन्ना गोसावी, मंगेश वाकळे, तुषार पवार, बब्बू शहा यांनी विद्यार्थ्यांना भारतामध्ये आढळणाऱ्या विषारी, निमविषारी व बिनविषारी साप, त्यांचे प्रकार, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांना ओळखण्याची पद्धत, सापांचा स्वभाव, रहिवासाचे ठिकाण, सर्पदंश झाल्यानंतर करावयाचे प्रथमोपचार याविषयी अतिशय मनोरंजक, नावीन्यपूर्ण अशी सविस्तर माहिती स्लाईड शोच्या माध्यमातून दिली. साप हे बळीराजाचे मित्र आहेत त्यांना मारू नये असा संदेश या कार्यशाळेच्या माध्यमातून देण्यात आला. विद्यालयाचे हरित सेना प्रमुख रोशन नेरकर यांनी प्रास्ताविकात आपल्या पृथ्वीवर राहणारा प्रत्येक सजीव आपल्या अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा घटक आहे. यातील कोणताही घटक नामशेष होता कामा नये व पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि आपल्या पृथ्वीला सुंदर बनवण्यासाठी वन्यजीवांचे संरक्षण हे आपले कर्तव्य आहे, असे मत व्यक्त केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article