6 महिन्यांनी महामार्ग दुरुस्तीचा मुहूर्त,तरी काम संथच;पुन्हा एकेरी वाहतुकीमध्ये वाढ:दीपनगर ते जुना फेकरी टोलनाका दरम्यान महामार्गावर पुन्हा अपघाताची शक्यता
6 days ago
2
मे महिन्यापासून दीपनगर ते जुना फेकरी टोलनाका दरम्यान रस्ता खराब झाला होता. हा रस्ता खालीवर झाल्याने तेथे अपघाताची शक्यता होती. यामुळे वरणगावकडून भुसावळकडे येणारी वाहतूक एकेरी करण्यात आली. तब्बल सहा महिन्यानंतर रस्त्याच्या कामाला मुहूर्त सापडला. परंतु, काम संथगतीने होत असून एकेरी वाहतुकीचा टप्पा या ठिकाणी वाढवल्याने अपघाताची भीती पुन्हा बळवली. चिखली ते तरसोद दरम्यान महामार्गाचे बरेच काम पूर्ण झाले असले तरी, नशिराबाद रेल्वे उड्डाणपूल अपूर्णच आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी कामे अपूर्ण असून अवघ्या काही दिवसात दीपनगर ते भुसावळ दरम्यान रस्ता खचला होता. त्याचप्रमाणे रेल्वेच्या उड्डाण पुलावर खड्डे झाल्याने या ठिकाणी वाहनांचे मोठे नुकसान होत होते. महामार्ग प्राधिकरणाने दीपनगर नवीन गेट ते फेकरी टोल नाकापर्यंतचा रस्ता बंद करत एकेरी वाहतूक सुरू केली. या ठिकाणी वळण असल्याने २६ अपघात घडले. परंतु रस्त्याच्या कामाला मुहूर्त सापडत नव्हता. पाऊस जास्त असल्यामुळे रस्त्याचे काम होत नसल्याचे कारण पुढे करत नोव्हेंबर महिन्यापर्यंत सदरचे काम लोटले गेले. रस्ता खराब असतानाही टोल वसुली सुरूच होती. याबाबत कोणीही बोलण्यास तयार नव्हते तर आता अवघ्या चार दिवसापूर्वी रस्त्याच्या कामाचा मुहूर्त सापडला. परंतु, काम संथगतीने होत असून एकेरी वाहतूक फेकरी टोल नाकाच्या पुढे वाढवत थेट एम.आय.तेली यांच्या पेट्रोल पंपापर्यंत करण्यात आला. या वाहतुकीमुळे अपघाताची भीती बळावली आहे, यामुळे कामाला वेग देऊन काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी त्रस्त झालेल्या प्रवाशांमधून होत आहे. ट्रॅफिकमुळे अडचण ^महामार्गावर ट्रॅफिक अधिक असल्याने अडचण येत आहे, तरीही काम लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असून एकेरी वाहतूक गुरुवारीपर्यंत डिव्हायडर तोडून अंतर कमी करणार आहे. -रुपेश गायकवाड, प्रकल्प व्यवस्थापक, महामार्ग प्राधिकरण लोकप्रतिनिधींनी ठेवले तोंडावर बोट गेल्या सहा महिन्यापासून एकेरी वाहतूक व फेकरी टोल नाक्याजवळ खड्ड्यांचा प्रवास असताना एकही लोकप्रतिनिधी बोलले नाही. यामुळे प्रवाशांना टोल भरूनही खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत आहे. आपली तक्रार कुणाकडे मांडावी, असाही प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची मागणी होते. कायम खड्ड्यांतून प्रवास गेल्या सहा महिन्यापासून एकेरी वाहतूक, त्यात खड्ड्यांमधून प्रवास असे असतानाही महामार्ग प्राधिकरणाकडून मात्र टोल वसुली सुरूच ठेवली गेली. हे चुकीचे सपशेल चुकीचे आहे. -डॉ.पंकज पाटील, नागरिक, वरणगाव
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
6 महिन्यांनी महामार्ग दुरुस्तीचा मुहूर्त,तरी काम संथच;पुन्हा एकेरी वाहतुकीमध्ये वाढ:दीपनगर ते जुना फेकरी टोलनाका दरम्यान महामार्गावर पुन्हा अपघाताची शक्यता