अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा सहभाग; सांघिक व वैयक्तिक संघाची निवड
अमरावती (Amravati Cultural programs) : अमरावती पंचायत समिती अंतर्गत तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव बुधवारी (दि.२२) उत्साहात झाला. या महोत्सवात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. सांस्कृतिक कार्यक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगीताच्या तालावर नृत्य करीत धमाल उडविली. विजयी संघ व खेळाडू जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवात सहभागी होणार आहे.
या (Amravati Cultural programs) क्रीडा महोत्सवाचे उदघाटन गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांनी केले.प्रमुख उपस्थिती सहाय्यक बीडीओ अंकिता लाड, गटशिक्षणाधिकारी धनंजय वानखडे, शिक्षण विस्तार अधिकारी संदीप बोडखे, सुधिर खोडे यांची होती. जिल्हा परिषद माजी शासकीय ऊर्दू मुलींची शाळा, कॅम्प अमरावती येथे क्रीडा स्पर्धेचे तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे जिल्हा परिषद माजी शासकीय मराठी मुलींची शाळा, कॅम्प अमरावती येथे आयोजन करण्यात आले होते.
अमरावती पंचायत समिती (Amravati Cultural programs) अंतर्गत शिक्षण, आरोग्य, पशु वैद्यकीय, कृषी, पंचायत, गटसाधन केंद्र आदी विभागातील अधिकारी व कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात सहभागी झाले होते. सांघिक खेळात कबड्डी, खो-खो, व्हाॅलीबाॅल, टेनिक्वाइड, दुहेरी, बॅडमिंटन दुहेरी, रिले, वैयक्तीक खेळात धावणे, लांब व उंच उडी, कुस्ती, गोळा फेक, टेनिक्वाइड, बुद्धिबळ या सांघिक व वैयक्तिक खेळाचा समावेश होता.
या (Amravati Cultural programs) क्रीडा महोत्सवात केंद्रप्रमुख मोहन जाधव, संजय कोकाटे, सुमती देखणे, स्मृती बाबरेकर, अनिल डाखोडे, नंदकुमार झाकर्डे, सुभाष सहारे, इकबाल पटेल, संध्या राठोड, सुरेंद्र मेटे, रा. ना. गावंडे, राजेंद्र दीक्षित, रामेश्वर स्वर्गीय, विनायक लकडे यांच्यासह विविध अधिकारी, कर्मचार्यांसह विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, विषय साधन व्यक्ती, विशेष शिक्षक यांनी सहभाग घेतला होता. ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी पर्यंत जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील विविध तालुक्यातील सांघिक व वैयक्तिक स्पर्धेतील विजयी खेळाडू सहभागी होणार आहे.
संगीताच्या तालावर थिरकले अधिकारी, कर्मचारी
तालुकास्तरीय (Amravati Cultural programs) क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. कराओके गीत, युगल गीत, समूह नृत्य, एकल नृत्य, नाटिका आदी कार्यक्रमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पाय संगीताच्या तालावर थिरकले…