असं म्हणतात भविष्य कोणाला माहिती नसतं, पुढच्या क्षणात आपल्यासोबत काय होणार आहे? साधी याबाबत देखील आपल्याला कल्पना नसते. मात्र जगात असे काही लोक आहेत, ज्यांना जगभरात काय होणार आहे, याची माहिती आधीच झालेली असते. ते त्यानुसार भाकीत देखील करतात, असं भाकीत वर्तवणाऱ्या लोकांना आपण भविष्यवेत्ता असं म्हणतो. बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस हे दोन जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता आहेत. त्यांनी केलेल्या भविष्यवाणींपैकी काही भविष्यवाणी या खऱ्या ठरल्याचा दावा देखील केला जातो. बाबा वेंगा यांनी 2025 बाबत काय म्हटलं हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र आज आपण अशा तरुणाच्या भविष्यवाणीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने आतापर्यंत दोन भविष्यवाणी केल्या आहेत, आणि त्याच्या या भविष्यवाणी खऱ्या देखील ठरल्या आहेत.
भविष्यवाणीच्या बाबतीत हा व्यक्ती बाबा वेंगांपेक्षा काही कमी नाहीये, त्याचं नाव निकोलस औजुला असं आहे. निकोलस अैजुला याचं वय 38 वर्ष आहे. आपण भविष्यवेत्ता असल्याचा दावा या व्यक्तीकडून करण्यात येतो. निकोलस अैजुला याने कोरोना महामारी, ट्रम्प यांचा विजय आणि ब्लॅक लाईव्ह मॅटर मुव्हमेंट अशा तीन भविष्यवाणी केल्या होत्या, त्या खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो.आता 2025 बाबत देखील निकोलसने खूपच भयावह भविष्यवाणी केली आहे. 2025 ला तिसरं महायुद्ध होऊ शकतं असं त्याने म्हटलं आहे.मानव जातीला लाज वाटेल अशा काही घटना या वर्षात घडतील असंही त्याने म्हटलं आहे.
काय आहे निकोलस अैजुला याची भविष्यवाणी?
द मिरच्या एका रिपोर्टनुसार निकोलस औजुला हा आपल्या भविष्यवाणीसाठी जगप्रसिद्ध आहे. त्याने कोव्हिड 19 आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाबाबत भविष्यवाणी केली होती ती खरी ठरली आहे. निकोलस याने 2025 मध्ये तीसरं महायुद्ध होऊ शकत, धर्म आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर हत्या, मारामाऱ्या अशा घटना घडतील. प्रचंड पाऊस पडेल जगावर पुराचं संकट येईल जगात महागाई प्रचंड वाढले अशी भविष्यवाणी केली आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)