ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा:केंद्र सरकारचे प्रमाणपत्र एका वर्षासाठी ग्राह्य; 1600 विद्यार्थ्यांना फायदा

6 hours ago 1
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस) विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शुक्रवारी जाहीर केले की, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी केंद्र सरकारच्या नमुन्यातील ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र विशेष बाब म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे सुमारे १,६०० विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेतला होता. या विद्यार्थ्यांनी राज्य सरकारच्या विहित नमुन्याऐवजी केंद्र सरकारच्या नमुन्यातील प्रमाणपत्र सादर केले होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता, सरकारने या शैक्षणिक वर्षापुरते हे प्रमाणपत्र स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांची प्रवेशासंबंधीची अडचण दूर होणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाला दिले आहेत. हा निर्णय केवळ चालू शैक्षणिक वर्षासाठी एकवेळची विशेष बाब म्हणून घेण्यात आला असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवेश घेतलेल्या प्रवेशित परंतु विहित नमुन्यामध्ये ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशास एका वर्षासाठी विशेष बाब म्हणून ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या जवळपास १ हजार ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शुक्रवारी दिली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात आलेल्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) संवर्गातून प्रवेशित झालेल्या १ हजार ६०० विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राऐवजी केंद्र सरकारच्या नमुन्यातील ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर केले होते. सदर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेऊन, केवळ या शैक्षणिक वर्षाकरिता एकवे ळची विशेष बाब विद्यार्थ्यांनी सादर केलेले केंद्र सरकारच्या नमुन्यातील ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र या प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांची अडचण दूर झाली आहे. यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाला दिले आहेत असेही मंत्री पाटील यांनी यांनी यावेळी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article