कारची दुचाकीला धडक, चालक गंभीरpudhari
Published on
:
08 Feb 2025, 4:17 am
Updated on
:
08 Feb 2025, 4:17 am
अमरावती : स्थानिक रहाटगांव चौकात भरधाव कारने समोरून येणार्या दुचाकीला जोरदार धडक दिली.या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी ७ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता घडली. घटनेनंतर संतापलेल्या नागरिकांनी कारची तोडफोड केली. अशोक काशानी (वय ४०) असे अपघातात जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. माहितीनुसार, अशोक काशानी कापड व्यवसायी आहे. नेहमीप्रमाणे शुक्रवारी दुपारी चार वाजता ते आपल्या दुचाकीने सिटीलँड मार्केटमध्ये जात होते. त्यावेळी समोरून येणार्या मारुती सुझुकी कार क्रमांक एमएच २७ बीई २७८० च्या चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात व्यावसायीक अशोक काशानी गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर मार्गावर तणावाची स्थिती निर्माण झाली होती.उपस्थित नागरिकांनी कारची तोडफोड केली. जखमी काशानी यांना रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस तिथे पोहोचले. त्यांनी कार जप्त केली. कार चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.