अमरावती(Amravati) :- राज्य सरकारच्या कृषी धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त करत गुरुवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) च्या कार्यकर्त्यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन केले. जिल्हाप्रमुख पराग गुडथे, प्रकाश मरोटकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून शिवसैनिकांची घोषणाबाजी
सोयाबीनला (Soyabean)८ हजार, कापसाला १० हजार आणि तुरीला १२ हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा, तसेच नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी सुरू करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात असताना घोषणाबाजीने परिसर दणाणला. शिवसैनिक जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा आग्रह धरत होते. मात्र पोलिसांनी गेटवरच त्यांना अडवले. यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. काही क्षण वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली, तर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय येत असलेल्या मंत्री दादाजी भुसे यांच्या ताफ्यातील वाहनावर कपाशी व तुरीचे झाड फेकण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन
यावेळी जिल्हाप्रमुख पराग गुडधे, मनोज कडू नरेंद्र पडोळे यांच्यासह उपजिल्हाप्रमुख ओंकार, ठाकरे, प्रफुल्ल भोजने, महेंद्र दीपटे, राजेश शर्मा उपजिल्हाप्रमुख अचलपूर, मेळघाट, नितीन हटवार, नरेंद्र निर्मळ, याह्या खान पठाण, अमरावती शहरप्रमुख प्रवीण हरमकर बडनेरा शहरप्रमुख संजय शेटे, प्रशांत वानखेडे, प्रदीप बाजड, अश्विन नागे अनुज कडू, मारुती सहारे, अंकुश कडू, शालिक मेहगे, राजू कडू, प्रफुल्ल म्हात्रे, विलास ढोणे, रवींद्र तिघरे, सुरेश भोयर, दिलीप बामनोटे, संतोष गावंडे, निलेश मुंदाने, निलेश आघाड, उपमहानगर प्रमुख विजय ठाकरे, सुनिल राऊत, मोहन क्षीरसागर, बंडू काठीलकर, सचिन ठाकरे, विनोद मंडालकर, विजय बेनोडकार, संजय गोडणे, देवराज कदम, अतुल सावरकर, अनिल नंदनवर, प्रमोद गिर्नाले, गजानन शिंगणे, माधव पोटे, मो. शारिकभाई, राजकुमार वानखेडे, अनंत शिंगणे, रवींद्र नाथे, बंडू अखरते, मंगेश घोरे, सागर घुले, दीपक शेवाने यांच्यासह असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक सहभागी झा