Badlapur Sexual Assault : नराधम अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात मृत्यू

1 hour ago 1

बदलापूरमधील शाळेत चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आज तळोजा कारागृहातून ठाणे येथे आणले जात असताना त्याने पोलिसांची बंदूक हिसकावली व त्यांच्यावर गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला आहे. अक्षयचा मृतदेह कळवा रुग्णालयात आणण्यात आला असून तेथे त्याच्या मृतदेहावर शवविच्छेदन होणार आहे.

अक्षयची पाहिली बायको त्याला लग्नानंतर पाच दिवसांनी सोडून गेली होती. तिने अक्षयवार बलात्कार आणि मारहाणीचा आरोप केला होता.  अक्षयच्या पहिल्या पत्नीने दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात चौकशीसाठी त्याला ताब्यात घेऊन बदलापूर पोलीस अक्षयचा ट्रान्झिट रिमांड घेण्यासाठी तळोजा कारागृहात गेले होते. आरोपी अक्षयला घेऊन सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पोलीस पथक मुंब्रा बायपासजवळ पोहोचले. त्यावेळी शिंदे याने एका हवालदाराची बंदूक हिसकावून त्याच्यावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल, दुसऱ्या अधिकाऱ्याने त्याच्यावर गोळी झाडली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article