बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा रणसंग्राम शुक्रवार, 22 तारखेपासून सुरू होणार आहे. पाच सामन्यांची ही कसोटी मालिका टीम इंडियाला आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतीम सामन्यात पोहोचण्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला दणका देण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली असून पहिल्या कसोटी सामन्यासाठी एका धडाकेबाज फलंदाजाची टीम इंडियाच्या संघात निवड करण्यात आली आहे.
थोडे ज्ञान तुमच्या भविष्यासाठी…मोहम्मद शमी मांजरेकरांवर संतापला, इंस्टावर स्टोरी पोस्ट करत…
पर्थमध्ये हिंदुस्थानी प्रमाण वेळेनुसाळी सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी सामना सुरू होणार आहे. रोहित शर्मा हा सामना खेळणार नसल्यामुळे टीम इंडियाचे सारथ्य करण्याची जबाबदारी या साम्यामध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाला धुळ चारण्यासाठी विराट कोहलीसह सर्वच खेळाडूंनी कसून सराव केला आहे. याच दरम्यान BCCI ने पहिल्या कसोटी सामन्यासाठी धडाकेबाज फलंदाज देवदत्त पडिक्कलची हिंदुस्थानी संघात निवड केली आहे. बीसीसीआयने एक्सवर ट्वीट करत याची माहिती दिली. देवदत्त पडिकल शुभमन गिलच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरण्याची शक्यता आहे. शुभमन गिलच्या बोटाला सरावादरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.
Devdutt Padikkal has joined the #TeamIndia squad.🙌
The left-handed batter shares his experience and excitement of training with the group ahead of the first Test of the Border-Gavaskar Trophy👌👌#AUSvIND | @devdpd07 pic.twitter.com/KxFrbIPMwS
— BCCI (@BCCI) November 21, 2024